Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने अखेर पडदा टाकला आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी एका विशेष गॅझेट नोटिफिकेशनद्वारे अमरावती (Amravati) शहराला राज्याची अधिकृत आणि कायमस्वरूपी राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे. संसदेने 'आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन) विधेयक २०२६' मंजूर केल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी या ऐतिहासिक निर्णयावर स्वाक्षरी केली. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारने तत्काळ ही अधिसूचना लागू केली आहे. या निर्णयामुळे आता आंध्र प्रदेशच्या राजधानीबाबतचा सर्व तांत्रिक आणि राजकीय संभ्रम कायमचा संपुष्टात आला असून, अमरावतीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.



'तीन राजधानी'च्या चर्चांना पूर्णविराम


२ एप्रिल रोजी लोकसभेनंतर राज्यसभेतही या विधेयकाला आवाजी मतदानाने संमती देण्यात आली. या ऐतिहासिक मंजुरीमुळे आता राज्यात यापुढे 'तीन राजधानी'चे मॉडेल राबवण्याचे किंवा राजधानी बदलण्याचे सर्व कायदेशीर पर्याय संपुष्टात आले आहेत. कायदा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जरी हे विधेयक आता मंजूर झाले असले तरी, हा सुधारित कायदा २ जून २०२४ पासून लागू झाल्याचे मानले जाईल. २०१४ च्या मूळ आंध्र प्रदेश पुनर्गठन कायद्यात दुरुस्ती करून हा मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या पाऊलामुळे आता अमरावतीच्या राजधानी पदावर कोणतीही कायदेशीर टांगती तलवार उरलेली नाही.



YSRCP चा केंद्राच्या निर्णयाला कडाडून विरोध


केंद्र सरकारने अमरावतीला कायमस्वरूपी राजधानीचा दर्जा दिल्यानंतर आता आंध्र प्रदेशात राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाने (YSRCP) या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत आपला विरोध दर्शवला आहे. "या निर्णयामुळे राजधानीसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झाले आहे," असा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. अमरावतीच्या विकासाची मुहूर्तमेढ २०१५ मध्ये तत्कालीन तेलगू देसम पक्षाच्या (TDP) कार्यकाळात रोवण्यात आली होती. मात्र, २०१९ मध्ये सत्तांतर होऊन वायएसआर काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त्यांनी 'तीन राजधानी'चे मॉडेल मांडले होते. यामुळे अमरावतीचा मुख्य प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून अधांतरी होता. आता केंद्राच्या नव्या कायद्यामुळे जगनमोहन रेड्डी यांच्या 'तीन राजधानी'च्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला मोठा धक्का बसला असून, राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.



NDA सरकारच्या निर्णयामुळे विकासकामांना वेग


२०२४ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर, सरकारने 'एकच राजधानी' म्हणून अमरावतीवर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे गेल्या काही काळापासून रखडलेले सर्व प्रलंबित प्रकल्प आता युद्धपातळीवर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. एकाच मजबूत राजधानीमुळे राज्याच्या प्रशासनात अधिक सुसूत्रता आणि स्थैर्य येईल, अशी आशा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. राजधानीच्या निश्चितीमुळे केवळ पायाभूत सुविधांचे कामच मार्गी लागणार नाही, तर राज्याच्या एकूणच प्रशासकीय कारभाराला मोठी चालना मिळणार आहे. गुंतवणुकीचे आणि विकासाचे केंद्र म्हणून अमरावतीला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी