Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या २ वर्षे ११ महिने वयाच्या चिमुरड्याने असा काही पराक्रम केला आहे की, अवघ्या जगाचे डोळे विस्फारले आहेत. कोंडा श्रेयांश मुरली कृष्णा पटेल असे या बालकाचे नाव असून, त्याने बुद्धीबळाच्या खेळात चक्क दोन विश्वविक्रम (World Records) आपल्या नावावर केले आहेत.



विक्रमी कामगिरीचा थरार


'रे चेस अकॅडमी'तर्फे (Ray Chess Academy) आयोजित एका विशेष कार्यक्रमात श्रेयांशने आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. त्याने केवळ १५ मिनिटे ५२ सेकंदात ९३ 'बॅक-रँक चेकमेट्स' सोडवले. इतक्या कमी वेळात अचूक चाली रचणे ही एक दुर्मिळ कामगिरी मानली जात आहे. एवढ्यावरच न थांबता, श्रेयांशने अवघ्या १ तास ९ मिनिटे ९ सेकंदात तब्बल २१ चेस बोर्ड व्यवस्थित मांडून दुसरा विश्वविक्रम प्रस्थापित केला.



आजीच्या डोळ्यांत आनंदाश्रू


ज्युबली हिल्स येथील आमदारांच्या कॉलनीतील सांस्कृतिक केंद्रात हा सोहळा पार पडला. यावेळी तेलंगणाचे उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क, मंत्री कोंडा सुरेखा आणि वाकीती श्रीहरी यांसारखे दिग्गज उपस्थित होते. श्रेयांश हा मंत्री कोंडा सुरेखा यांचा नातू आहे. आपल्या नातवाचा हा ऐतिहासिक क्षण पाहून कोंडा सुरेखा यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. एका चिमुरड्याने इतक्या लहान वयात देशाचे नाव जागतिक स्तरावर नेल्याचे पाहून त्या भावूक झाल्या होत्या.



ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होणार सन्मान


श्रेयांशची आई, कोंडा सुस्मिता पटेल यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, श्रेयांशला लहानपणापासूनच बुद्धीबळाची आवड आहे आणि परिवार त्याच्या या आवडीला पूर्ण पाठिंबा देईल. श्रेयांशला या कार्यक्रमात चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, आगामी काळात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये (लंडन) 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स' तर्फे त्याला अधिकृत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

El Nino ची पाठ फिरताच 2027 मध्ये येणार La Nina चं महासंकट; अतिवृष्टी आणि महापुराचा इशारा

जगभरातील हवामानाचे चक्र वेगाने बदलत असून आता एक नवीन आणि अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे. एल निनोचा प्रभाव ओसरत

Census of India : 2027 च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी होणार सुरुवात, काही राज्यांमध्ये नोंदणी लांबणीवर

केंद्र सरकारने अखेर देशातील आगामी जनगणनेची अधिकृत घोषणा करत तिचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारताचे जनगणना

Delhi Fire : दिल्लीत मंगोलपुरी येथील कारखान्याला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Delhi News: दिल्लीतील मंगोलपुरी औद्योगिक क्षेत्रात असलेल्या पादत्राणे बनवण्याच्या कारखान्याला शुक्रवारी रात्री

ISRO : इस्रोची मोठी कामगिरी! भारताचा NVS-03 नेव्हिगेशन उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने शुक्रवारी भारताचा पुढील पिढीतील नेव्हिगेशन उपग्रह NVS-03

मुंबई- बेंगळुरू प्रवास आता सुस्साट, 988 Km चं अंतर फक्त 16 तासांत पूर्ण करता येणार

मुंबई: केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री- एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय ग्राहक व्यवहार- प्रल्हाद जोशी, अन्न

Vande Bharat Sleeper: रात्री वाराणसीला शांत झोपायचं अन् सकाळी दिल्लीत उठायचं! वंदे भारत स्लीपरचं पाहा संपूर्ण शेड्युल

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेकडून 'नाईट ट्रेन'ची घोषणा करण्यात आली होती. ही एक्स्प्रेस