The Black Market : वाडीबंदर परिसरातून ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई : दक्षिण मुंबईतील वाडीबंदर परिसरात अवैध गॅस साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा शिधावाटप यंत्रणेने पर्दाफाश केला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत यंत्रणेने ४५१ सिलिंडर आणि ८ वाहनांसह तब्बल ४० लाख ६१ हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वाडीबंदर ब्रीज आणि डोंगरी परिसरात गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा विभागाचे नियंत्रक चंद्रकांत डांगे यांना मिळाली होती. त्यानुसार डांगे यांनी दिलेल्या विशेष आदेशांनंतर या परिसरात सापळा रचण्यात आला. या मोहिमेत गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक करणाऱ्या ८ गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. त्यात घरगुती आणि व्यावसायिक वापराचे एकूण ४५१ सिलिंडर आढळून आले.


ही कारवाई उपनियंत्रक (अंमलबजावणी) गणेश बेल्लाळे आणि उपनियंत्रक (परिमंडळ 'अ') माधुरी शिंदे यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष घटनास्थळी सहाय्यक शिधावाटप अधिकारी प्रदीप यादव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हा सापळा यशस्वी केला. या पथकात भूपेंद्र गवळी, महेश देशपांडे, राहुल साळुंखे यांच्यासह अन्य १४ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.



काळाबाजार खपवून घेणार नाही


"जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार किंवा अवैध साठवणूक करून सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम उघडण्यात आली आहे. अशा प्रकारची कृत्ये कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत. येणाऱ्या काळातही संशयास्पद हालचालींवर आमचे बारीक लक्ष असेल आणि यापेक्षाही कठोर कारवाई केली जाईल," असा इशारा चंद्रकांत डांगे यांनी यावेळी दिला. या प्रकरणातील आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या रॅकेटची मुळे नेमकी कुठे पोहोचली आहेत, याचा शोध प्रशासन घेत आहे.

Comments
Add Comment

Mumbai Rain : गणपती बाप्पाच्या आगमनाआधी मुंबईत पावसाची जोरदार हजेरी; अनेक सखल भागांत साचले पाणी

मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही तास शिल्लक असताना मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवात परतीच्या प्रवासाची चिंता मिटली, मुंबई मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई: लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येकजण उत्सुक आहोत. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये मुंबईत मोठ्या

Nitesh Rane Modi Express : मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून दुसरी 'मोदी एक्सप्रेस' उद्या रवाना होणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली दुसरी 'मोदी एक्सप्रेस' रविवारी

Mumbai Crime: बनावट मृत्यू प्रमाणपत्र अन्...... कोटींचा फ्लॅट विकला; मुंबईत बायकोचा धक्कादायक कारनामा!

मुंबई: 'मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं' ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल किंवा त्या म्हणीचा कोणाला बोलण्यासाठी सुद्धा

Mumbai Railway Megablock: प्रवाशांसाठी मोठी अपडेट! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक, गणेशोत्सवाची शॉपिंग करायला जाण्याआधी वाचा

मुंबई: रविवारी अर्थात उद्या घराबाहेर पडण्याआधी एकदा ही आवश्य बातमी वाचा. मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या

Namo Express : ‘नमो एक्स्प्रेस’ आणि विशेष बसेसच्या माध्यमातून दीड हजारांहून अधिक भाविक कोकणाकडे रवाना

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या गावच्या बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाता यावे,