मागाठाणे–गोरेगाव १२० फूट डी.पी. रोड प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन
April 12, 2026 09:43 PM
मुंबई : लोखंडवाला–मागाठाणे १२० फूट डी.पी. रोड या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवार १२ एप्रिल रोजी कांदिवली पूर्व येथील लोखंडवाला सिंग इस्टेट, संत ज्ञानेश्वर चौक येथे आमदार भातखळकर यांच्या हस्ते झाले.
मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेगवान दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्यास तो मोलाची भूमिका बजावणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार भातखळकर म्हणाले, “हा १२० फूट डी.पी. रोड प्रकल्प केवळ एक रस्ता नसून, परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात सुलभता निर्माण होऊन त्यांच्या वेळेची व श्रमांची बचत होईल.” तसेच, नागरिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देत विकासकामांना गती देण्याचा आपला सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पामुळे परिसरातील अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार असून नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.