Kanjur Marg to Badlapur Metro : लवकरच धावणार शहरातील सर्वात लांब मेट्रो; बदलापूरकरांना होणार फायदा

मुंबई : संपूर्ण मुंबईत मेट्रो आपले जाळे विणत चाललं आहे, त्यामुळे मुंबईकरांचा दररोजचा प्रवास हा सुखकर आणि सोयीस्कर होतो आहे. अनेक ठिकाणी जलद गतीने जाणे हे मेट्रोमुळे शक्य झाले आहे. त्यातच आता लवकरच शहरातील सर्वात लांब मेट्रो मार्गिका आकार घेणार आहे, त्यामुळेच कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो १४ प्रकल्पासाठी नव्या सल्लागार तज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे.



शहरातील सर्वाधिक लांब मेट्रो मार्गिका


मेट्रो १४ मार्गिकेच्या उभारणीसाठी पुन्हा नव्याने प्रकल्प अहवालाचे पुनर्विलोकन केले जाणार आहे. यापूर्वीही या मेट्रोचा अहवाल तयार करण्यात आला होता. आता त्या अहवालाची समीक्षा केली जाणार आहे. बदलापूर परिसरातून अनेक प्रवासी मुंबईत नोकरीसाठी येतात, त्यामुळे नोकरदार वर्गाला आणि लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा विविध मेट्रो प्रकल्पांना जोडणारी ही एकमेव मेट्रो मार्गिका असणार आहे.




ठाणे - भिवंडी मेट्रोचे काम


मेट्रो ५ आणि कल्याण ते तळोजा १२ या मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. मेट्रो १४ मुळे कल्याण पलीकडच्या शहरातील प्रवाशांना लाभ होणार आहे. कांजूर मार्ग ते बदलापूर दरम्यान धावणारी ही मेट्रो वेगाने मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने प्रकल्प अहवाल पुनविर्लोनासाठी निविदा मागवल्या आहेत.



लाखो प्रवाशांना होणार फायदा


झपाट्याने विकास होणाऱ्या बदलापूर परिसरातील लाखो प्रवाशांना मुंबईत जाण्यासाठी सध्या तरी उपनगरीय रेल्वेशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे प्रचंड गर्दीचा सामना करत मुंबईत येणाऱ्या नोकरदारांना ही मेट्रो म्हणजे वरदान ठरणार आहे.




असा असेल मार्ग


कांजूर मार्ग ते ज्युवेली गाव, बदलापूर
मार्गाची लांबी : ४३. ६९
प्रस्तावित स्थानकांची संख्या : २४ ( कांजूर ,मार्ग येथे एक भूमिगत स्थानक )
मेट्रोची रचना : सहा डब्यांची गाडी
कमाल वेग : ९० किमी प्रति तास
वाहतुकीचा सरासरी वेग : ५५ किमी प्रतितास

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर