Drug Department : औषध विभागाची सात महिन्यांत मोठी कारवाई; 17.73 कोटींचा साठा जप्त, 555 परवाने रद्द

या काळात एकूण 7,950 तपासण्या करण्यात आल्या असून, 2,629 नियामक कारवाया करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत सुमारे 17.73 कोटी रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला.

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) औषध विभागाने 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2026 या सात महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातील औषध उत्पादक आणि विक्री आस्थापनांची तपासणी करत मोठी नियामक कारवाई केली. या काळात एकूण 7,950 तपासण्या करण्यात आल्या असून, 2,629 नियामक कारवाया करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत सुमारे 17.73 कोटी रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला.

555 परवाने रद्द, 2,074 परवाने निलंबित


औषध विक्री आस्थापनांच्या 6,548 तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये 2,483 नोटिसा बजावण्यात आल्या असून, 450 परवाने रद्द आणि 1,859 परवाने निलंबित करण्यात आले. तसेच औषध उत्पादक आणि इतर आस्थापनांच्या 1,402 तपासण्यांमध्ये 405 नोटिसा देण्यात आल्या. या कारवाईत 105 परवाने रद्द, तर 215 परवाने निलंबित करण्यात आले.

विभागनिहाय आकडेवारीनुसार, कोकण विभागात सर्वाधिक 2,502 तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय 808 नोटिसा बजावण्यात आल्या असून, 712 नियामक कारवाया करण्यात आल्या.

131 धाडी; 37 गुन्हे दाखल, 19 जणांना अटक


औषध विभागाने या सात महिन्यांत 131 ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत 17.73 कोटी रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. विविध प्रकरणांत 37 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 19 जणांना अटक करण्यात आली.

बनावट औषधांसह विनापरवाना विक्रीवर कारवाई


विभागाने केलेल्या प्रमुख कारवायांमध्ये विनापरवाना औषध उत्पादन आणि विक्रीप्रकरणी 53 धाडी टाकण्यात आल्या. यात 12.73 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणांत 14 गुन्हे दाखल करून 6 जणांना अटक करण्यात आली.

बनावट औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांविरोधात 14 धाडी टाकून 2.19 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी 10 गुन्हे दाखल झाले. वैद्यकीय उपकरणे नियम, 2017 चे उल्लंघन केल्याप्रकरणी 5 धाडींत 84.06 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

मिथ्याछाप औषधांच्या म्हणजेच लेबलिंगविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3 धाडी टाकून 83.39 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. आक्षेपार्ह जाहिरातींविरोधात 31 धाडींत 55.57 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तर NDPS कायद्यांतर्गत 10 धाडी टाकून 10 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 10 जणांना अटक करण्यात आली.

 
Comments
Add Comment

BMC Action : मालाड येथील नाहर नगर मार्गाचे रुंदीकरण,अडथळा आणणारी १७ बांधकामे हटवली, ‘पी पश्चिम’ विभागाची कारवाई*

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पी पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ४६ मधील नाहर नगर मार्ग येथे प्रस्तावित १८.३० मीटर

Eknath Shinde : पर्यावरण जनजागृतीसाठी राज्यभर फिरणार 5 विशेष रथ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पंढरपूर : पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजावे, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण

Jijai Movie : स्त्रीशक्तीचा धगधगता अवतार! रिंकू राजगुरूचा ‘जिजाई’ चित्रपटगृहांत दाखल

मुंबई :  घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना कुटुंबासाठी सतत धडपडणारी स्त्री स्वतःच्या सुरक्षिततेसाठी,

PM SVANidhi : PM स्वनिधी पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राची बाजी; राज्याला 5 राष्ट्रीय पुरस्कार

Maharashtra News: पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी

Railway Block : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी 7 दिवस विशेष ब्लॉक; मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा

Thane News : अनधिकृत गौण खनिज उत्खनन भोवले; ठाण्यात 52 जणांसह कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Thane News: ठाणे तालुक्यात अनधिकृत गौण खनिज उत्खनन, साठवणूक आणि वाहतूक केल्याप्रकरणी दंडाची रक्कम न भरणाऱ्या 52 जणांवर