Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. निशांत राजेश ठाकरे (रा. डोंबिवली वेस्ट, जि. ठाणे) असे मृत तरुणाचे नाव असून तो आपल्या मित्रांसह पर्यटनासाठी कोकणात आला होता.


मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास निशांत आपल्या मित्रांसोबत आरे बीचवर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी समुद्रातील पाण्याचा वेग आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात ओढला गेला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी आणि शोधण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तो सापडला नाही. घटनेनंतर तातडीने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.



दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ७:१५ वाजता काळबादेवी-फडजीवाडी परिसरातील मारुती मंदिराजवळ समुद्रकिनाऱ्यावर एक मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पाटील आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर निशांतच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली.


पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवला, जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बीएनएसएस कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.


या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, समुद्रकिनाऱ्यावर पोहताना खबरदारी घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Bad Breath Remedies :तोंडाची दुर्गंधी कायमची पळवून लावा! करा हे अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने