मुंबई : एका मुलीवर प्रेम होते पण लग्न दुसरीशी केलं. घराची प्रतिष्ठा जाईल म्हणून प्रेयसीलाच संपवलं. एका तरुणीची विष देऊन हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकं घडलं काय ?
हुक्केरी तालुक्यातील नाडीगुडी परिसरात हे दोघे राहत असून कृष्ण सहदेव पाटील आणि सत्यव्वा संतोष हेलवारा यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्न झालं तरीही कृष्ण आणि सत्यव्वा यांच्यात प्रेमप्रकरण सुरु होते. अचानक १७ फेब्रुवारीला दोघे घरातून गायब झाले आणि बेलवाडी येथे पोचले.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करत संशयितांना अटक केली असून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.






