Haryana Pattern : कंत्राटी कामगारांसाठी 'हरियाणा पॅटर्न'चा अभ्यास करणार

मुंबई : महाराष्ट्रातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून, विशेषतः कंत्राटी कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 'हरियाणा पॅटर्न'चा अभ्यास करण्यासाठी लवकरच एका अभ्यास गटाची स्थापना करण्यात येईल, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी गुरुवारी सांगितले.


भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने आज वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर 'कामगार आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष ॲड. अनिल ढुमणे यांनी केले. आंदोलनानंतर कामगार मंत्र्यांनी कामगार नेत्यांसोबत सविस्तर चर्चा केली आणि संघटनांच्या मागण्यांवर सकारात्मक पावले उचलण्याचे जाहीर केले.


कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर म्हणाले, महानगर पालिका आणि विविध मंडळांमधील कंत्राटी कामगारांचे शोषण थांबवण्यासाठी हरियाणा राज्याच्या धर्तीवर धोरण राबवण्याबाबत विचार केला जाईल. त्यासाठी अभ्यास गट त्वरित स्थापन करण्यात येईल. सुरक्षा रक्षकांच्या भरती प्रक्रियेबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयामध्ये कामगारांच्या हितासाठी तात्काळ सुधारणा करण्यात येईल. घरेलू कामगारांच्या मागणीनुसार, त्यांच्या वयोमर्यादेत ६० वर्षांवरून ६५ वर्षांपर्यंत वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय आणि एमआयडीसी क्षेत्रात दवाखाने सुरू करण्यासाठी प्रादेशिक समित्या गठीत करून कामाला गती दिली जाईल, असेही कामगार मंत्री म्हणाले.


बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देताना होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सरकारी ओळखपत्राशी संलग्न करण्यात आली आहे. ज्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळेल. विडी कामगारांच्या किमान वेतनासाठी मालक आणि संघटनांची संयुक्त बैठक बोलावण्यात येईल. तसेच नवीन चारही लेबर कोड संदर्भात संघटनांनी दिलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करण्यात येईल,असेही कामगार मंत्र्यांनी स्पष्ट केले. माथाडी मंडळांचे कामकाज उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सुरू असून, कामगार संघटनांच्या सर्व मागण्यांवर मंत्रालयीन स्तरावर स्वतंत्र बैठका घेऊन विषय मार्गी लावले जातील, असे आश्वासनही कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.

Comments
Add Comment

Ganpati Special Train : कोकण आणि गणेशोत्सवासाठी रेल्वेचा मोठा दिलासा; मुंबई-कोल्हापूर दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai :

Nitesh Rane : कोकणातील जलमार्गांना दिशा देण्यासाठी मंत्री नितेश राणेंकडून अभ्यास दौरा

गोव्यात जलवाहतुकीचा प्रत्यक्ष अनुभव; सिंधुदुर्गात जहाजबांधणी, दुरुस्ती उद्योगाच्या संधींचा अभ्यास मुंबई :

Draft Voter List : प्रारूप मतदार यादी आणि २०२४ च्या विधानसभा मतांची तुलना करणे चुकीचे; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा स्पष्ट खुलासा

Mumbai :

Navi Mumbai Airport: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास होणार अधिक स्वस्त; नेमकं कारण काय?

नवी मुंबई: विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. डिसेंबर २०२५ पासून सुरू

FDA action : अन्न व औषध प्रशासनाचा दणका! शिळ-दिवा परिसरातील २० लाखांचा अस्वच्छ अन्नसाठा जप्त; मुंबई-पुण्यातील नामवंत हॉटेल्सचे परवाने निलंबित

Mumbai : सणासुदीचा काळ जवळ येत असताना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध तीव्र मोहीम

MMRDA transfer : एमएमआरडीएच्या सामाजिक विकास शाखेत मोठा फेरबदल; १६ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या, अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी

Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या सामाजिक विकास विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल