FDA action : अन्न व औषध प्रशासनाचा दणका! शिळ-दिवा परिसरातील २० लाखांचा अस्वच्छ अन्नसाठा जप्त; मुंबई-पुण्यातील नामवंत हॉटेल्सचे परवाने निलंबित

Mumbai : सणासुदीचा काळ जवळ येत असताना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध तीव्र मोहीम उघडली आहे. ठाणे, मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात FDA ने धडक कारवाई करत अनेक नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि फरसाण उत्पादकांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये शिळ-दिवा परिसरातील बेकायदा कारखान्यांवर कारवाई करत तब्बल २०.४८ लाखांचा अस्वच्छ आणि घातक माल जप्त करण्यात आला आहे.



शिळ-दिवा रोडवर २१ लाखांचा माल जप्त आणि ११ आस्थापनांवर कारवाई


अन्न व औषध प्रशासन, ठाणे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ९ सप्टेंबर २०२६ रोजी वास्कर कंपाउंड, शिळ-दिवा रोड, खर्डी गाव परिसरात अचानक छापे टाकले. फरसाण, वेफर्स, चिवडा आणि नमकीन तयार करणाऱ्या ११ आस्थापनांची तपासणी केली असता तेथे अत्यंत निकृष्ट आणि मानवी आरोग्यास हानिकारक प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले.


या कारखान्यांमध्ये बटाटा वेफर्स, फराळी चिवडा, शेव, भाकरवडी, पामोलीन तेल व मैदा यांचा साठा जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान खालील गंभीर बाबी उघडकीस आल्या:





  • बहुतांश आस्थापनांकडे अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार आवश्यक वैध परवाना नव्हता.




  • उत्पादन क्षेत्राची फरशी अतिशय घाणेरडी, चिकट आणि साचलेल्या तेलामुळे दूषित झालेली आढळली.




  • परिसराबाहेर सांडपाणी साचल्याने तीव्र दुर्गंधी पसरली होती, तसेच झुरळे आणि उंदरांचा मोठा प्रादुर्भाव आढळला.




  • कामगार कोणतेही अप्रोन, हातमोजे किंवा टोपी न घालता अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ बनवत होते.





कारवाई झालेल्या प्रमुख पेढ्या:


१. मे. राकेश लालजी गुप्ता


२. मे. राहुल फूड्स


३. मे. कृष्णा बनाना चिप्स


४. मे. कोमल वेफर्स


५. मे. चस्का मस्का फूड्स


६. मे. ओम साई ट्रेडर्स फरसाण


७. मे. हरीश चस्का फूड


८. मे. धर्मराज फ्रूट सप्लाय


९. मे. अंतिमा फरसाण आणि वेफर्स


१०. मे. नित्या फरसाण आणि चकली


११. मे. विमल नमकीन


या सर्व ११ आस्थापनांकडून एकूण २८,९५५ किलो आणि ५६ लिटर असा एकूण २०,४८,८०१.५ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून त्यांचे परवाने व नोंदणी त्वरित निलंबित करण्यात आली आहे.



मुंबईतील नामवंत हॉटेल्स आणि स्नॅक्स सेंटरचे परवाने निलंबित


मुंबई विभागात अन्न सुरक्षा मानदंडांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६ नामांकित आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.





  • श्री गजानन वडापाव, स्नॅक्स सेंटर (कांजूरमार्ग पश्चिम): तापमानाचे नियमित निरीक्षण न करणे, कीटक प्रवेश रोखण्यासाठी अपूर्ण उपाय आणि उघड्या स्वयंपाकघरात वडापाव बनवणे यांसारख्या त्रुटी आढळल्या.




  • M/s. Samarth Sweets (जोगेश्वरी पूर्व): प्रवेशद्वाराजवळ उघडी गटारे, कचरा आणि 'linear workflow' नसल्यामुळे क्रॉस-कंटामिनेशचा धोका आढळला.




  • एकविरा झुणका भाकर केंद्र (मुलुंड पूर्व): अत्यंत दाटीवाटीची जागा, वायुविजनाचा अभाव आणि उघडी कचराकुंडी आढळली.




  • मनीषा स्वीट्स (मुलुंड पूर्व): उघड्या व अस्वच्छ जागेत उत्पादन विभाग चालवणे आणि छतावर काजळी साचल्याचे निदर्शनास आले.




  • याशिवाय मे. नवाब सीख कॉर्नर आणि हॉटेल अश्विन तसेच मे. जय महाराष्ट्र मसाला डोसा कॉर्नर यांच्यावरही स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.





पुणे आणि संभाजीनगरमध्येही कारवाईचा सपाटा


पुणे विभागातील ३ प्रमुख हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत:


१. हॉटेल शाही (मलकापूर, कराड, सातारा)


२. M/s. Saber Restaurant (भुशी गाव, लोणावळा)


३. M/s. Sairat Biryani (कोरेगाव पार्क, पुणे)


याशिवाय, छ. संभाजीनगरमधील मे. शेळके मामा ढाबा रेस्टॉरंट (खुलताबाद) येथे यापूर्वी बजावलेल्या सुधारणा नोटीसची अंमलबजावणी न केल्यामुळे प्रशासनाकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.



सामूहिक अन्नवाटपाबाबत FDA चे महत्त्वाचे आवाहन


सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम, यात्रा किंवा भंडारा अशा सामूहिक अन्नवाटपाच्या कार्यक्रमांमध्ये अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी FDA ने विशेष निर्देश दिले आहेत.





  • परवानाधारक केटरर किंवा स्वयंपाकगृहामार्फत अन्न तयार होत असल्यास, कार्यक्रमाच्या किमान ७ दिवस अगोदर Food & Drug Grievance Portal या पोर्टलवर "सामूहिक अन्नवाटप पूर्वसूचना नमुना" सादर करणे अनिवार्य आहे.




  • आयोजकांनी स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, तापमान नियंत्रण आणि सुरक्षित अन्न साठवणुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




अन्नपदार्थाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर किंवा वरील पोर्टलवर संपर्क साधावा. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

Comments
Add Comment

Navi Mumbai Airport: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास होणार अधिक स्वस्त; नेमकं कारण काय?

नवी मुंबई: विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. डिसेंबर २०२५ पासून सुरू

MMRDA transfer : एमएमआरडीएच्या सामाजिक विकास शाखेत मोठा फेरबदल; १६ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या, अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी

Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या सामाजिक विकास विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल

Mumbai Monorail : मुंबई मोनोरेलला पुन्हा ब्रेक! सुरक्षा जाळ्यांमुळे सेवा सुरू होण्यास आणखी विलंब?

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची वाहतूक सेवा असलेली मोनोरेल पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा आणखी लांबण्याची

Saifee Hospital Defamation Case : सैफी रुग्णालयाचा महिला डॉक्टरविरोधात १२५ कोटींचा मानहानीचा दावा; छळाच्या आरोपांवरून वाद आता न्यायालयात!

मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध सैफी रुग्णालयाने (Saifee Hospital) आपल्या एका प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थी (ट्रेनी)

Disha Saliyan Case : दिशा सालियनप्रकरणी CBI कडून तपास अधिकाऱ्याची नियुक्ती, DSP पुरण कुमार यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती

दिशा सालियनच्या (Disha Saliyan) कथित आत्महत्या प्रकरणाला आता एक नवे आणि महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च

Anna Bansode : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी अण्णा बनसोडे यांची निवड; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्याचा निर्धार

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'च्या