Ganpati Special Train : कोकण आणि गणेशोत्सवासाठी रेल्वेचा मोठा दिलासा; मुंबई-कोल्हापूर दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार



Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



गाड्यांचे वेळापत्रक आणि फेऱ्या:




  • गाडी क्रमांक ०१४१७ (विशेष गाडी): ही गाडी CSMT येथून १२ सप्टेंबर २०२६ आणि १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.२० वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल. (एकूण २ सेवा)




  • गाडी क्रमांक ०१४१८ (विशेष गाडी): ही गाडी कोल्हापूर येथून १२ सप्टेंबर २०२६ आणि १४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ००.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १३.३० वाजता CSMT येथे पोहोचेल. (एकूण २ सेवा)





प्रमुख थांबे:


या विशेष गाड्या दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहेत.



गाडीची डब्यांची रचना (कंपोझिशन):


प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्यांमध्ये १ वातानुकूलित प्रथम वर्ग, २ वातानुकूलित द्वितीय वर्ग, ३ वातानुकूलित तृतीय वर्ग, ४ शयनयान (स्लीपर), ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार अशी एकूण १६ डब्यांची रचना असेल.



आरक्षण कधी आणि कुठे सुरू होणार?


गाडी क्रमांक ०१४१८ आणि ०१४१७ या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या ११ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व PRS केंद्रांवर आणि IRCTC संकेतस्थळावर सुरू होईल. तसेच, सामान्य दरासह अनारक्षित डब्यांचे तिकीट UTS प्रणालीद्वारे काढता येईल. प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी 'रेलवन' (RailOne) ॲप देखील डाउनलोड करता येईल.


गाड्यांच्या थांब्यांच्या वेळेबद्दल सविस्तर माहितीसाठी नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टम (NTES) ला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




Comments
Add Comment

Nitesh Rane : कोकणातील जलमार्गांना दिशा देण्यासाठी मंत्री नितेश राणेंकडून अभ्यास दौरा

गोव्यात जलवाहतुकीचा प्रत्यक्ष अनुभव; सिंधुदुर्गात जहाजबांधणी, दुरुस्ती उद्योगाच्या संधींचा अभ्यास मुंबई :

Draft Voter List : प्रारूप मतदार यादी आणि २०२४ च्या विधानसभा मतांची तुलना करणे चुकीचे; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा स्पष्ट खुलासा

Mumbai :

Navi Mumbai Airport: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास होणार अधिक स्वस्त; नेमकं कारण काय?

नवी मुंबई: विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. डिसेंबर २०२५ पासून सुरू

FDA action : अन्न व औषध प्रशासनाचा दणका! शिळ-दिवा परिसरातील २० लाखांचा अस्वच्छ अन्नसाठा जप्त; मुंबई-पुण्यातील नामवंत हॉटेल्सचे परवाने निलंबित

Mumbai : सणासुदीचा काळ जवळ येत असताना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध तीव्र मोहीम

MMRDA transfer : एमएमआरडीएच्या सामाजिक विकास शाखेत मोठा फेरबदल; १६ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या, अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी

Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या सामाजिक विकास विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल

Mumbai Monorail : मुंबई मोनोरेलला पुन्हा ब्रेक! सुरक्षा जाळ्यांमुळे सेवा सुरू होण्यास आणखी विलंब?

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची वाहतूक सेवा असलेली मोनोरेल पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा आणखी लांबण्याची