Mumbai Cricket Team : मुंबई क्रिकेट संघाचा ऐतिहासिक निर्णय; मुंबईचे खेळाडू होणार मालामाल, मिळणार लाखोंचा पगार

मुंबई :  मुंबईतून अधिकाधिक हिरे भारतीय क्रिकेट संघाला मिळावेत यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खेळाडूंना त्यांच्या मेहनतीचा त्यांच्या खेळाचा आता पगार मिळणार असून खेळाडूंचा आर्थिक प्रश्न लवकरात लवकर सुटणार असून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल. आता केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाच नाही, तर मुंबईच्या देशांतर्गत खेळाडूंनाही 'सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट' म्हणजेच वार्षिक पगार दिला जाणार आहे आणि अशी प्रणाली लागू करणारी मुंबई ही देशातील पहिली राज्य संघटना ठरलीय.




श्रेण्यांनुसार पगार


देशांतर्गत स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना करारबद्ध करणारी मुंबई ही देशातील पहिली क्रिकेट संघटना आहे. ठरलेल्या श्रेण्यांनुसार अ श्रेणीतील खेळाडूंना १२ ते २० लाख, बी श्रेणीतील खेळाडूंना ८ ते १२ आणि तर क श्रेणीतील खेळाडूंना ६ ते ८ लाख पगार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम मॅच फी आणि दैनंदिन भत्त्यांव्यतिरिक्त असणार आहे. म्हणजे मुंबईच्या खेळाडूंना आता आर्थिक विवंचनेशिवाय फक्त खेळावर लक्ष केंद्रित करता येईल.


मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक स्पष्टीकरण देत म्हणाले आहे की, " मुंबई क्रिकेटमधील एका नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. अशी करारबद्ध पद्धत राबवणारी मुंबई ही देशातील पहिली क्रिकेट संघटना आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. या करारामुळे मुलांना चांगले आर्थिक स्थैर्य मिळेल शिवाय मुंबईसाठी अधिक खेळण्याची हिंमतही वाढेल.


या करारामुळे मुंबईच्या खेळाडूंमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे, मुलांनी क्रिकेट संघटनेचे आभार मानले आहे. खेळात आडव्या येणाऱ्या पैशाच्या अडचणी आता लवकरच संपणार असून दडपण दूर होईल आणि खेळाडू आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील.




अटी आणि शर्थी


खेळाडूंना या करारा चा लाभ घ्यायचा असल्यास पाच निकष पूर्ण करणे हे बंधनकारक असणार आहे.


१. खेळाडू मुंबई संघटनेकडे नोंदणीकृत असणे.
२. तंदुरुस्तीचे निकष पूर्ण केलेले असावेत
३. गेल्या दोन मोसमात कोणत्याही आयपीएल संघासह करारबद्ध नसावा.
४. तसेच शिफारशी समितीने निवड करणे आवश्यक आहे
५. भारत अ तसेच कनिष्ठ संघातून काही मोसमात खेळलेल्या खेळाडूंना हा करार लागू नसणार आहे.


भारतासाठी आपल्या खेळातून योगदान देणाऱ्या कितीतरी खेळाडूंची आर्थिक चणचण आता संपणार असून लवकरच नवीन तारे आपल्याला उभारताना दिसणार आहेत.

Comments
Add Comment

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या