अभिषेक शर्माचा खेळ 9 धावांवर आटोपला
नेपाळने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताकडून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ही स्फोटक सलामी जोडी मैदानात उतरली होती. समोर दुबळा नेपाळ संघ असल्याने आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. दोघंही फेल गेले. अभिषेक शर्माने त्याच्या शैलीला साजेशी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू काही पट्ट्यात बसला नाही. या प्रयत्नात त्याने फक्त एक षटकार मारला. त्यानंतर त्याला खेळ काही पुढे जाऊ शकला नाही. या डावाच्या सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माने लेग साईडला उंच फटका मारला. पण सीमेपार चेंडू पाठवण्यात अपयशी आणि झेल बाद झाला. अभिषेक शर्माने 13 चेंडूत फक्त 9 धावा केल्या आणि तंबूत परतला.
Asia Cup Rising Stars 2026 : नाणेफेक नेपाळने जिंकली आणि भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी, कर्णधार तिलक वर्मा म्हणाला...
आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि नेपाळ आमनेसामने आले आहे. साखळी फेरीत भारताचा पहिलाच सामना असून विजयी सलामी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. 50 ...
आयुष बडोनीही स्वस्तात बाद
अभिषेक शर्मानंतर फलंदाजीची संधी आक्रमक फलंदाज आयुष बडोनीला मिळाली. मात्र त्याचा खेळही फार काळ टिकला नाही. अवघ्या दोन धावांवर असताना ललित राजबंशीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. राजबंशीच्या फ्लाइटेड चेंडूवर बदोनीने क्रीजच्या बाहेर येत कव्हर्सच्या वरून फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू पडल्यानंतर बाहेर गेला आणि बडोनी फसला. यात विकेटकीपर चूक न करता चेंडू पकडला आणि त्याला यष्टीचीत केलं.