Asia Cup Rising Stars 2026: भारताने साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात नेपाळला लोळवलं, तिलक-कुशाग्रची शतकी खेळी

रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात इंडिया ए संघाने विजयी सलामी दिली. भारताने नेपाळसमोर विजयासाठी 332 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण नेपाळचा संघ 26 धावांवर गारद झाला.

रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने आपला विजयी ठसा उमटवला. नेपाळने नाणेफेकीचा कौल जिंकल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. खरं तर भारताला प्रथम फलंदाजीच करायची होती, असं तिलक वर्माने नाणेफेकीनंतर सांगितलं होतं. हा निर्णय भारताच्या फायद्याचा ठरला असंच म्हणावं लागेल. भारताची सुरूवात काही खास झाली नाही. पण कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांनी डाव सावरला आणि भारताच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली.  विजयी धावांचा पाठलाग करताना नेपाळचा संघ 26 धावा करू शकला. यासह भारताने पहिल्या सामन्यात 306 धावांनी विजय मिळवला. भारत ए संघाने गट ब मध्ये 2 गुण आणि +6.120 नेट रनरेटसह पहिलं स्थान पटकावलं आहे. भारताचा पुढचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 22 नोव्हेंबरला होणार असून कोण बाजी मारणार? याची उत्सुकता वाढली आहे.









भारताचा डाव


भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आल्यानंतर अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ही स्फोटक जोडी मैदानात उतरली होती. ही जोडी चौकार षटकारांची आतषबाजी करेल असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. संघाच्या 42 धावा असताना तीन धक्के बसले, त्यामुळे भारतीय संघ बॅकफूटवर गेला होता. वैभव सूर्यवंशी 26, अभिषेक शर्मा 9 आयुष बडोनी 2 धावा करून बाद झाले. त्यानंतर कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांनी डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 191 चेंडूत 206 धावांची भागीदारी केली. कुमार कुशाग्र 102 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकरांच्या मदतीने 117 धावा केल्या. तर कर्णधार तिलक वर्माने 113 चेंडूत 107 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. रिंकु सिंह 9, शहबाज अहमद 8, विपराज निगम 0 आणि हार्षित राणा 1 धाव करून बाद झाले. तर सूर्यांश शेडगे 36 आणि प्रिन्स यादव 1 धावांवर राहिला.






भारताने विजयासाठी दिलेलं 332 धावांचं आव्हान काही नेपाळला पेललं नाही. नेपाळचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यामुळे भारताचा विजय पहिल्या षटकातच निश्चित झाला. आघाडीच्या तीन फलंदाजांना तर खातंही खोलता आलं नाही. अर्जुन कुमाल 0, कुशल भुर्तेल 0 आणि बसीर अहमद 0 धावांवर बाद झाले. त्यानंतर दीपक डुमरेही 1 धाव करून तंबूत परतला. संघाची 1 धाव असताना 4 गडी बाद झाले होते. त्यानंतर तसंच घडत गेलं. टप्प्याटप्प्याने विकेट पडत गेले आणि भारताचा पहिला विजय निश्चित झाला. भारताकडून प्रिन्स यादवने 5, हर्षित राजाने 4 आणि शहबाज अहमदने 1 विकेट काढली.

Comments
Add Comment

Rising Stars Asia Cup: वनडे फॉरमेटच्या पहिल्याच परीक्षेत अभिषेक शर्मा नापास; अवघ्या 13 चेंडूंतच डाव आटोपला!

अभिषेक शर्मा टी20 फॉरमेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. हे त्याने आपल्या फलंदाजीने सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे

दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 8 गडी राखून नमवलं, WTC गुणतालिकेत झाला असा बदल

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ही मालिका पाकिस्तानने 1-0 ने जिंकली. पहिला

Asia Cup Rising Stars 2026 : नाणेफेक नेपाळने जिंकली आणि भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी, कर्णधार तिलक वर्मा म्हणाला...

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि नेपाळ आमनेसामने आले आहे. साखळी फेरीत भारताचा पहिलाच सामना असून

IND vs NZ 1st Test: केएल राहुल-यशस्वी जयस्वालचं न्यूझीलंडला जोरदार प्रत्युत्तर, 10 वर्षानंतर न्यूझीलंडने पाहिला असा दिवस

[caption id="attachment_1077112" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे.

IND vs NZ 1st Test: दुसऱ्या दिवसावर टीम इंडियाची पकड, दिवसअखेर 1 गडी बाद 159 धावा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने 6 गडी गमवून 243

भारताने न्यूझीलंडला 3-2 ने पराभवाची धूळ चारली, शताब्दी हॉकी मालिकेत टीम इंडियाची विजयी सलामी

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमधील ऐतिहासिक क्रीडा संबंधांना 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने