Operation Sindoor : “मर्यादा ओलांडू नका, भारत विसरत नाही”; पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने भारतीय लष्कराचे सूचक ट्विट

- भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण


मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग केले होते. या भ्याड हल्ल्याची उद्या म्हणजेच बुधवार २२ एप्रिल रोजी वर्षपूर्ती असून त्याच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्कराने ट्विटरव (एक्स) पोस्ट करत “मर्यादा ओलांडू नका, भारत विसरत नाही” असे सांगत ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण करवून दिली आहे.


यासंदर्भातील पोस्टमध्ये भारतीय सेनेने नमूद केले की, “जेव्हा मानवतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा उत्तरही ठाम आणि निर्णायक असते. न्याय मिळाला आहे. भारत एकजूट आहे.” यासोबतच एका ग्राफिकमध्ये “काही मर्यादा कधीही ओलांडल्या जाऊ नयेत. भारत विसरत नाही,” असा संदेश देण्यात आला.



पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली होती. भारतीय सेनेने पाकिस्तान तसेच पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले चढवले. या कारवाईदरम्यान ९ प्रमुख दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आले आणि लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद व हिज्बुल मुजाहिदीन यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले. या लष्करी कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये ४ दिवस तणावपूर्ण संघर्ष सुरू राहिला. मोठे नुकसान सहन केल्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधत युद्धविरामाची विनंती केली. पाकिस्तानच्या विनवणीनंतर अखेर १० मे रोजी दोन्ही बाजूंमध्ये युद्धविरामावर सहमती झाली.







सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक करत ते स्पष्ट राजकीय निर्देशांखाली तिन्ही सैन्यदलांमधील उत्कृष्ट समन्वयाचे उदाहरण असल्याचे म्हटले होते. तसेच, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन सुदर्शन चक्र’ची घोषणा केली होती. या मोहिमेचा उद्देश शत्रूच्या घुसखोरीला आळा घालणे आणि भारताच्या आक्रमक क्षमतांमध्ये वाढ करणे हा आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि