ट्रम्पकडून ती आनंदवार्ता आली अन् शेअर बाजाराने मोठी उसळी मारली ; नेमकं काय घडलं ?

अमेरिका इराण युद्धामुळे शेअर बाजारात ( Share Market )मोठ्या घडामोडी घडत होत्या. गुंतवणूकदार यामुळे चांगलेच धास्तावाले होते. त्यामुळे शेअर बाजारात देखील मोठी पडझड पहायला मिळत होती. हे युद्ध लवकरात लवकर थांबावे अशी आशा सर्वानाच होती पण कधी अमेरिकेतून तर कधी इराणमधून निराशा समोर येत होती. असे असले तरी सध्या युद्ध काही दिवसांसाठी बंद आहे. अशातच अमेरिकेतून अशी काही गुडन्यूज समोर आली आहे आहे की शेअर बाजारात ( Share Market ) मोठी उसळी दिसून आली. विशेष म्हणजे आखाती देशातील युद्धाची (war )धग कायम असतानाही शेअर बाजाराने मोठी उसळी मारली आहे.


आज सकाळी बाजार उघडताच घडले असे काही...


आज सकाळी बाजार उघडताच सकाळी 9:20 वाजता, सेन्सेक्स 430 अंकांच्या तेजीसह 78,950 अंकावर व्यापार करत होता. तर निफ्टी 50 हा 117 अंकांच्या उसळीसह 24,480 च्या स्तरावर ट्रेड करत होता. भारत आणि अमेरिका व्यापार कराराविषयी ( India US Trade Deal) मोठी अपडेट समोर आल्यानंतर आखाती युद्धाची भीती झटक्यात बाजूला झाली आणि गुंतवणूकदारांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. आणि गुंतवणुकीस पुन्हा समोर आले. जणू आज मंगळवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे मंगलच मंगल झाले. बीएसई बास्केटमध्ये अदानी पोर्ट (Adani Port) , आयसीआयसीआय बँक (ICICI ), एल अँड टी, बजाज फायनान्स हे टॉप गेनर ठरले.


आज सेन्सेक्स आणि निफ्टी सुसाट


आज बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी रॉकेटसारखा उडाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्सने 500 अंकाहून अधिक उसळी आली. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, NSE Nifty ने तेजीचा घोडा दौडवला. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 96.86 अंक वा 0.12 टक्क्यांच्या तेजीसह उघडला होता. पहिल्या सत्रात सेन्सेक्सने 78,617.16 अंकाची सुरुवात केली. एनएसई निफ्टी 50 ने दिवसाची सुरुवात चांगली झाली. आज निफ्टी 50 हा 9.70 अंक वा 0.04 टक्क्यांच्या उसळीसह 24,374.55 च्या स्तरावर उघडला.


अमेरिकेतून आलेल्या वृत्तानुसार, भारत आणि अमेरिकेत व्यापारी करारात ( India US Trade Deal) मोठा बदल पहायला मिळू शकतो. 20 एप्रिलपासूनच याविषयीच्या चर्चा सुरु असून त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. अमेरिकेन न्यायालयाने टॅरिफ हे बेकायदेशीर म्हटले होते. टॅरिफ (tariff ) रद्द करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान दर्पण जैन यांच्या नेतृत्वात एक डझन भारतीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अमेरिकन दौऱ्यावर असल्याचे आणि ते अनेक विषयावर चर्चा करणार असल्याचे समोर येत आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.