Nashik : अशोक खरातच्या आजच्या सुनावणीत काय घडलं ? भोंदू खरातची रवानगी आता...

नाशिक : स्वतःला ‘दैवी शक्ती’ असलेला पुरुष भासवून कोणाचे आर्थिक शोषण तर अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा (Ashok Kharat) पाय दिवसेंदिवस खोलात जात आहे. त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक आणि महत्त्वाचे खुलासे होत आहे. आज (गुरुवारी) भोंदू खरातला पाचव्या गुन्ह्यात नाशिक सत्र न्यायालयात (Nashik Seassion Court) हजर करण्यात आले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. तर सहाव्या गुन्ह्याच्या ताब्यासाठी तपास अधिकाऱ्यांकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे.

महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि स्वतःला दैवी पुरुष असल्याचे भासवून अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. भोंदू खरातला पाचव्या गुन्ह्यात ६ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्याची रवानगी आता कारागृहात होणार आहे. तर सहाव्या गुन्ह्याच्या (Case) तपासासाठी अशोक खरात (Ashok Kharat) याला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीकडून (SIT ) न्यायालयाला पत्र देण्यात आले आहे.

दरम्यान, अशोक खरातची आज पाचव्या गुन्ह्यात रवानगी नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) होईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर एसआयटी पुन्हा खरातला सहाव्या गुन्ह्यात ताब्यात घेणार आहे. यानंतर उद्या (शुक्रवारी) त्याला सहाव्या गुन्ह्याच्या संदर्भात न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अशोक खरातविषयी थोडक्यात...

नाशिकमधील स्वतःला आध्यात्मिक गुरु व अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणारा भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) हा लैंगिक शोषण, फसवणूक आणि बनावट खाती उघडून ५७ लाखांहून अधिक रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अटकेत आहे. SIT (विशेष तपास पथक) या प्रकरणाचा तपास करत असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी झालेल्या एसआयटीच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आजपासून तो न्यायालयीन कोठडीत असणार आहे तर उद्या त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मुळचा सिन्नरचा असलेला लक्ष्मण एकनाथ खरात, दहावी नापास असून, नंतर तो 'अशोक खरात' नावाने 'कॅप्टन' असल्याचे सांगत लोकांना फसवत असे. लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्याने अनेकांची आर्थिक लूट तर केलीच शिवाय अनेक महिलांचे लैंगिक शोषण देखील केले.  खरातच्या मुलीच्या नावावर १०० कोटींची मालमत्ता असल्याचा संशय असून, या प्रकरणी दुहेरी कारवाई सुरू आहे. उच्चपदस्थ अधिकारी, राजकारणी आणि व्यावसायिकांना जाळ्यात ओढून तो कोट्यवधींची माया गोळा करत होता, अशी माहिती समोर आली आहे.
Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''