Nashik : टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरण, दानिशचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नाशिक : नाशिकच्या टीसीएस कंपनीतील (Nashik TCS Case) धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. बळजबरी मांस खाण्यास भाग पाडणे, विशिष्ट धर्माचा ग्रंथ वाचण्यासाठी देखील प्रवृत्त करणे, तसेच कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ अशा काही गंभीर घटना याठिकाणी घडल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या दानिश शेख याचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिकरोड जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.


 हे कृत्य जाणीवपूर्वक आणि द्वेषपूर्ण भावनेतून


पीडिताच्या धार्मिक श्रद्धा दुखावण्यासाठी तसेच धार्मिक श्रद्धेचा अपमान करण्यासाठी हे कृत्य जाणीवपूर्वक आणि द्वेषपूर्ण भावनेतून केल्याचे निरीक्षण न्यायालयाकडून नोंदवण्यात आले आहे. फिर्यादीनुसार, संशयितांनी पीडित तरुणाच्या जेवणावरच गदा आणली नाही, तर त्याला विशिष्ट धर्माचा ग्रंथ वाचण्यासाठी देखील भाग पाडले. कंपनीत काम करताना पीडिताबाबत खोटे अहवाल वरिष्ठांकडे पाठवून, इतर सहकाऱ्यांसमोर त्याचा वारंवार अपमान करण्यात आला. या मानसिक त्रासासोबतच त्याला गंभीर परिणामांच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. न्यायालयाने या आरोपांची दखल घेत या गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले.


महिला कर्मचाऱ्यांचेही लैंगिक छळाचे आरोप


महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणाची व्याप्ती केवळ एका कर्मचाऱ्यापुरती मर्यादित नाही. या कंपनीतील (Nashik TCS Case) महिला कर्मचाऱ्यांनीही लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी यांच्यासह असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी सध्या नाशिकरोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन असून, राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.


२८ एप्रिलला होणार पुढील सुनावणी


मुंबई नाका पोलीस ठाण्यात आठ आणि देवळाली कॅम्प पोलिसांत एक, असे एकूण नऊ गुन्हे या टोळीविरुद्ध नोंद आहेत. तर, संशयित निदा एजान खान गर्भवती असूनही तिच्यावरील आरोपांचे स्वरूप पाहता न्यायालयाने तिला अटकेपासून संरक्षण दिलेले नाही. तिच्या अर्जावर २७ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. तर दानिश याने १६६ क्रमांकाच्या गुन्ह्यात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर पहिली सुनावणी झाली. पुढील सुनावणी २८ एप्रिल रोजी होणार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''