भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी भारत रशियासाठी तर कधी रशिया भारतासाठी संकटाच्या काळात भक्कम उभा राहिला आहे. आखाती देशात सध्या तणाव आहे. होर्मुज खाडी इराण आणि अमेरिका युद्धामुळे बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने तेलाची समस्या आहे. जगात अनेक ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. अशातच रशिया आणि भारताने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने भारताच्या आजूबाजूच्या देशांची चांगलीच जळजळ होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि रशियाने एका मोठ्या संरक्षण करारावर सह्या केल्या. या कराराअंतर्गत रशिया भारताला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे पुरवणार आहे. या कराराची अद्याप अधिकृत घोषणा झाली पण करार जवळपास झाला असल्याची माहिती आहे. या कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या करारामध्ये रशिया भारताला R-37 M क्षेपणास्त्र देणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताला चीन आणि पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी या क्षेत्रपास्त्राचा अत्यंत मोठा फायदा होऊ शकतो. Big deal between India and Russia


ऑपरेशन सिंदूरदरम्यान ( Operation Sindoor) पाकिस्तानमधून भारतावर मोठे बॉम्ब टाकले जात होते. यावेळी रशियन बनावटीचे क्षेपणास्त्र हवेतच पाकिस्तानचे हे बॉम्ब निकामी करत होते. भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताची लष्करी ताकद जगाला दाखवली. रशियन माध्यमांनुसार, R-37 M हे सर्वाधिक पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. त्याचा वेग अंदाजे 300-400 किमी आहे.


या क्षेपणास्त्राचा वापर हवाई पूर्व सूचना आणि इंधनवाहू विमानांद्वारे, शत्रूच्या जेट विमानांना अत्यंत अचूकतेने टार्गेट करते. भारताची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि भारत मोठ्या प्रमाणात लष्करी करार करत आहेत. रशियाचे अध्यक्ष पुतिनदेखील भारत दाैऱ्यावर लवकरच येणार आहेत.

Comments
Add Comment

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?

Gold Silver Rate Today : PM मोदींचे 'ते' आवाहन अन् सोन्या-चांदीचे भाव गडगडले! चांदी थेट 'इतक्या' हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

मुंबई : परदेशी चलनावरील वाढता दबाव कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत संतुलन राखण्यासाठी पंतप्रधान