Jalgaon accident : भीषण अपघातात नववधूसह तिघांचा दुर्दैवी अंत; वऱ्हाड घेऊन निघालेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Jalgaon accident : जळगाव जिल्ह्यातुन एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्याच्या धरणगावमध्ये (Dharangaon Accident News) एक अतिशय हृदयद्रावक अपघाताची घटना घडली आहे. धरणगाव तालुक्यातील वराडखुर्दजवळ महामार्गावर टायर फुटल्याने भीषण कार अपघात झाला असून लग्नाहून परतणाऱ्या क्रूझर गाडीला टँकरवर धडक बसली, यात नववधूसह ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले असून एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. आनंदाच्या क्षणावर अशाप्रकारे विरझन पडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त आहे.


( Jalgaon Accident News ) नववधूसह तिघांचा दुर्दैवी अंत


मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या वापी येथून लग्नाचं वऱ्हाड घेऊन अकोला येथे ही क्रूझर कार जात होती. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराडखुर्द जवळ महामार्गावर असतानाच या धावत्या क्रूझर कारचं टायर अचानक फुटलं आणि ही कार त्या रोडलगत उभ्या गॅस टँकरवर जाऊन धडकली. अतिशय भीषण अशी ही धडक होती. लग्न झाल्यानंतर नववधूला परत घेऊन येताना जळगाव मधील वराड गावाजवळ हा अपघात घडला आहे. यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, जिचं नुकतंच लग्न झालं अशा नववधूचाही मृतांमध्ये समावेश असून त्यामुळे सगळेच हळहळले. ( Jalgaon Accident News )


( Jalgaon Accident News ) आता कुठे संसाराची स्वप्ने रंगू लागली होती अन..


नववधूच्या हाताची मेहंदीही सुकली नव्हती, आता कुठे संसाराची स्वप्ने रंगू लागली होती आणि अशाप्रकारे अपघात नववधूचा दुर्दैची अंत झाला. या अपघातात नववधू पूजा रवी वाघळकर, दत्तू भागवत, जगदीश वाघळकर अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे असून तिघेही एकच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. तर या अपघातात आणखी 6 जण जखमी असून लहान मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.


( Jalgaon Accident News ) जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी हंबरडा फोडला


दरम्यान, जळगाव जिल्हा रुग्णालयात (Jalgaon District Hospital) नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे दिसून आलं. वऱ्हाड घेऊन निघालेल्या कुटुंबावर अशाप्रकारे काळाने घाला घातल्यानेसंपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून काळानं अशी अचानक झडप घातल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''