Nashik: आईसोबतचा वाद टोकाला, ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

नाशिक : नाशिकच्या पंचवटी (panchavti) परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आईसोबत झालेल्या आर्थिक वादाच्या रागातून ३८ वर्षीय ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने घराच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. देवेंद्र संजय थोरात (३८, रा. निर्माण उपवन, ढिकलेनगर, पंचवटी) असे मृताचे नाव आहे. (Nashik suicide news)


नेमकं काय घडलं ?


मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास देवेंद्र थोरात यांचे त्यांच्या आईसोबत पैशांच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. कौटुंबिक वाद इतका विकोपाला गेला की मध्यरात्री एकच्या सुमारास देवेंद्र यांनी नैराश्यातून थेट घराच्या पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारली. या घटनेत देवेंद्र यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. घडलेली घटना लक्षात येताच मेहुणे गौरव जयवंत वायकुळ यांनी त्यांना उपचारासाठी आडगाव नाका येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. (Nashik suicide news)


मात्र, हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तपासणीअंती पहाटे मृत घोषित केले. देवेंद्र यांच्या या टोकाच्या कृतीमुळे दोन लेकरं पोरकी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे (Panchvati Police Station) उपनिरीक्षक पंकज सोनवणे, सहायक उपनिरीक्षक दत्तू शेळके यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली. पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत. मृत देवेंद्र थोरात यांच्या पश्चात आई आणि दोन मुले असा परिवार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''