Casting Yard Accident : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड दुर्घटना, VJTI मार्फत चौकशी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड येथे आज प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी तातडीने करण्यात येईल. चौकशीत कामगार सुरक्षिततेत कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कार्यस्थळी कामगारांच्या सुरक्षिततेबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून तिचे पालन करण्यात आले होते का याची शहानिशा करण्यात येईल. तसेच, महानगरपालिका प्रशासनाकडून वस्तुस्थिती तपासली जाईल. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी सुनिश्चित करण्यासाठी ‘VJTI’च्या प्राध्यापकांच्या तज्ज्ञ चमूची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर चमू सत्वर चौकशी करून वस्तुनिष्ठ व तथ्याधारित अहवाल सादर करणार आहे. अहवालातील निष्कर्षांच्या आधारे संबंधित कंत्राटदारांविरुद्ध कठोर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल. कामगार सुरक्षिततेतील कोणत्याही त्रुटींची ओळख पटवून त्या दूर करण्यासाठी ठोस शिफारसी सादर करण्याची विनंती 'VJTI' टीमला करण्यात आली आहे.


मुंबईत विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. कामगार सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य असून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत महानगरपालिका प्रशासनाचे शून्य सहिष्णुतेचे धोरण कायम आहे.


सर्व उंच आधार संरचना (गॅन्ट्री), क्रेन्स व इतर यंत्रसामग्रीची तृतीय पक्षामार्फत सखोल व पुनः सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . तसेच, सुरक्षा लेखापरीक्षण नियमित व काटेकोरपणे राबविण्यात येत आहे.


किनारी रस्त्याच्या (वेसावे ते भाईंदर) सर्व पॅकेजमध्ये ‘कार्यस्थळ -आधारित सुरक्षा’ची आदर्श प्रणाली अनिवार्यपणे राबविण्यात येईल. कामगार सुरक्षा पडताळणीसाठी स्वतंत्र तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून सुरक्षा प्रोटोकॉलची सखोल, सर्वंकष व पुनर्तपासणी सुनिश्चित करण्यात येईल; कोणतीही त्रुटी आढळल्यास तत्काळ दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Dahi Handi in mumbai local train : धावत्या लोकल ट्रेनमध्येच फोडली दहीहंडी! बदलापूर-ठाणे लोकलमध्ये महिला प्रवाशांचा अनोखा गोपाळकाला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात एका अत्यंत अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवाची दृश्ये समोर

Pratap Sarnaik : स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा

Rojgar Mahakumbh : मुंबईत २९ सप्टेंबरला रोजगाराचा 'महाकुंभ'; पंडित दीनदयाळ उपाध्याय 'रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र' अंतर्गत शहरात १० ठिकाणी भव्य मेळावे

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई

Bhandara gad news : भंडारा-भामचंद्र गडाच्या सद्यस्थितीचा महिनाभरात अहवाल सादर करा; सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पावन तपोभूमी असलेल्या देहूजवळील भंडारा आणि भामचंद्र गडाच्या

Adivasi Vikas Vibhag : शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, शिक्षण आयुक्तालयाकडून १ हजार ६०० उमेदवारांची यादी प्राप्त; आदिवासी विकास विभागाकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर

मुंबई : आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित)

Eknath Shinde : रिक्षा-टॅक्सी चालकांच्या कष्टाला सन्मानाची जोड, आनंद दिघे यांच्या नावाने उभे राहिलेले महामंडळ देशासाठी आदर्श; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : दिवसभर अथक परिश्रम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार