Mamata Banerjee the 'jalmudi' of defeat : बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांना पराभवाची ‘झालमुडी’ खाऊ घातली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला; सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी विजयाबद्दल केले अभिनंदन


मुंबई : “पश्चिम बंगाल आसाम आणि पुद्दुचेरीमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली असून, हा भव्य विजय म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख राजकारणावर जनतेने दिलेली पसंतीची पावती आहे”, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली. पश्चिम बंगालमध्ये प्रथमच पूर्ण बहुमतासह कमळ फुलले असून, तेथील जनतेने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गुंडागर्दी आणि भ्रष्टाचाराला कंटाळून त्यांना पराभवाची 'झालमुडी' खाऊ घातल्याचा टोलाही त्यांनी लगावला.


उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता बंगालमध्ये 'डबल इंजिन' सरकारद्वारे विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरुद्ध असलेला जनक्षोभ मतदानातून स्पष्ट झाला असून, 'सबका साथ, सबका विकास' या धोरणाला बंगालमध्ये व्यापक पाठिंबा मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीमुळेच ममता बॅनर्जींचा अभेद्य किल्ला ढासळला, तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांची अथक मेहनत या ऐतिहासिक विजयामागे असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीत मिळालेला हा विजय विचारांचा असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील ही यशस्वी कामगिरी विशेषत्वाची असल्याचे शिंदे म्हणाले.



स्टॅलिन यांचा पराभव केल्याबद्दल जनतेचे आभार

आसाममधील निकालांवर बोलताना ते म्हणाले की, आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता देऊन जनतेने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासनाला मिळालेली ठाम साथ आहे. यासोबतच, तामिळनाडूतील निकालांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी सनातन धर्मावर वादग्रस्त विधाने करणाऱ्या एम. के. स्टॅलिन यांचा पराभव केल्याबद्दल तेथील जनतेचे आभार मानले. लोकशाहीत जनताच सर्वोच्च असते, हे या निकालावरून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.



अजित पवारांच्या विकासाभिमुख राजकारणाला कौल


बारामती विधानसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी मिळवलेल्या विक्रमी विजयाबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. बारामतीच्या जनतेने विकासाभिमुख राजकारणाला पाठिंबा देत अजित पवार यांच्या प्रगतिशील विचारांना कौल दिला आहे. देशभरात विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यांवर आधारित राजकारण बळकट होत असून, आगामी काळात याचा सकारात्मक परिणाम देशाच्या प्रगतीवर दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४