नाशिककरांसाठी आनंदाची बातमी ! 'या' रुग्णालयात आता ‘डायलिसीस’ सुविधा मोफत

नाशिक : किडनीच्या विकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांचा विकार अधिक बळावला की, त्यांना डायलिसीसशिवाय (dialysis) पर्याय नसतो. डायलिसीसचा खर्च खूप जास्त असल्याने अनेकांना तो घेणे परवडत नाही. त्यामुळे अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि डायलिसीस घेत नाही. अशा परिस्थिती मृत्यू ओढावण्याचा धोका बळावतो. परंतु आता नाशिक जिल्ह्यातील अशा रुग्णांना एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे.


राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून राज्य शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मोफत डायलिसीस (dialysis)सुविधा लवकरच येवला उपजिल्हा रुग्णालयात (Yeola Sub-District Hospital)सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने, भारत सरकारचा उपक्रम असलेल्या मे. एचएलएल लाईफ केअर लिमिटेड यांच्या मार्फत ही डायलिसीस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.



या अंतर्गत मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांच्या पाठपुराव्यातून येवला उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वतंत्र डायलिसीस कक्ष उभारण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने येवला उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र डायलिसीस कक्ष निर्माण करण्यात येत असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. या कक्षात सात डायलिसीस खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सामान्य कुटुंबातील रुग्णांना मोठा फायदा होईल. लवकरच डायलिसिस कक्षाचा शुभारंभ केला जाणार आहे.


या कक्षामध्ये एकूण ७ डायलिसीस खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. अत्यावश्यक औषधे व साहित्यांसह संपूर्ण डायलिसीस प्रक्रिया मोफत उपलब्ध होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. या उपक्रमामुळे येवला आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांना नाशिक किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, वेळ व खर्चाची बचत होणार आहे.



डायलिसिस म्हणजे काय ?


डायलिसिस (Dialysis) ही एक जीवनरक्षक वैद्यकीय उपचार पद्धती आहे, जी किडनी (मूत्रपिंड) निकामी झाल्यावर रक्तातील टाकाऊ पदार्थ, विषारी द्रव्ये आणि अतिरिक्त पाणी कृत्रिमरित्या फिल्टर करते. जेव्हा किडनी १०% पेक्षा कमी कार्य करते किंवा कायमस्वरूपी निकामी होते, तेव्हा शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यासाठी हे उपचार केले जातात.


किडनी नैसर्गिकरित्या जे काम करते, तेच काम डायलिसिस मशीनद्वारे रक्तातील युरिया, क्रिएटिनिन काढून केले जाते. डायलिसिसचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत, हेमोडायलिसिस (Hemodialysis): मशीनद्वारे रक्त फिल्टर करणे आणि पेरिटोनियल डायलिसिस (Peritoneal Dialysis): पोटातील पडद्याचा वापर करून रक्त शुद्ध करणे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''