नाशिक : श्री काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा संपन्न, पहा खास क्षणचित्रे

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ च्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात बुधवारी धर्मध्वज उभारणी सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या २१ फूट उंच पंचधातूच्या धर्मध्वजस्तंभावर भगवा धर्मध्वज विधिवत पूजन करून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फडकविण्यात आला.



पंचधातूपासून तयार केलेल्या धर्मध्वजस्तंभावर ११ बाय ५ फूट आकाराचा भगवा ध्वज आहे. त्यावर हनुमंतरायांची प्रतिमा तसेच सूर्यदेवतेचे ‘ॐ’ चिन्ह अंकित करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक अलंकरण करण्यात आले होते. सोहळ्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला औपचारिक धार्मिक प्रारंभ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महापौर हिमगौरी आडके-आहेर, अयोध्या न्यासाचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, महंत सुधीरदास पुजारी उपस्थित होते.मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक अलंकरण करण्यात आले होते. या सोहळ्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला औपचारिक धार्मिक प्रारंभ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



कार्यक्रमाला आमदार पंकज भुजबळ, आमदार सीमा हिरे, ‘फिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण (मालेगाव), अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील (नाशिक), निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपमहापौर विलास शिंदे, पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, शांताराम शास्त्री भानोसे, स्वामी अमृतानंद, वैष्णव व शैव आखाड्यांचे महंत, विश्वस्त शांताराम आवसारे, शुभम मंत्री, साधू-महंत आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Bad Breath Remedies :तोंडाची दुर्गंधी कायमची पळवून लावा! करा हे अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने