Nashik : देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर जांबुटके येथे आकारास येणार

नाशिक : देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी (Dindori) तालुक्यातील जांबुटके येथे आकारास येणार आहे. त्यासाठी आवश्यक जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) करण्यात आले. यावेळी विविध सामंजस्य करारांचे आदान- प्रदान करण्यात आले.


कुंभ उद्योग संगम आणि नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट हॉटेल ताज गेट वे येथे पार पडली. त्यात या जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. गुंतवणूक परिषदेत करण्यात आलेल्या ३०० हून अधिक सामंजस्य करारांच्या माध्यमातून १३ हजार १९० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न, औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते.



अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टरचे दस्तऐवज हस्तांतरित केले. या प्रकल्पामुळे आदिवासी क्षेत्रातील औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळणार असून स्थानिक आदिवासी बांधवांच्या कौशल्य विकास आणि शाश्वत रोजगारासाठी तो उपयुक्त ठरणार आहे. या क्लस्टरच्या विकासासाठी आदिवासी विकास विभागाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.


सन २०२६ मध्ये जिल्ह्यात एकूण ३०१ सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून १३ हजार १८९ कोटी ८८ लाख रुपयांची गुंतवणूक आणि ३२ हजार ४८७ रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यापैकी काही करारांचे दस्तऐवज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात हस्तांतरित करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे नाशिक हे भविष्यात उद्योजकांचे आकर्षक ठिकाण ठरेल आणि औद्योगिक विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.



नाशिक हे गुंतवणुकीसाठी ‘नेक्स्ट डेस्टिनेशन’ (Next destination) म्हणून उदयास येत असून या प्रक्रियेत निमा, आयमा, नाईस, स्टार्स, एमसीसीआय, लघु उद्योग भारती तसेच सहकारी औद्योगिक वसाहतींचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. ‘मैत्री’ या एकल पोर्टलद्वारे गुंतवणूकदारांना आवश्यक परवानग्या व अडचणींचे निराकरण सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यात येत आहे.


यावेळी व्हीईएल (VEL) नागपूर यांच्यामार्फत त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड येथे शाश्वत जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी अंदाजे २८ कोटी रुपयांचा करार करण्यात आला. हा प्रकल्प CSR अंतर्गत राबविण्यात येणार असून त्यात रचना, निधी उभारणी आणि २५ वर्षांचे संचालन समाविष्ट आहे. तसेच वेस्टइन वाइनयार्ड रिसोर्ट अँड स्पा यांच्याकडून ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून सुमारे ६०० रोजगार निर्मिती होणार आहे.


याशिवाय ब्रह्मांदन पाइप्स लि. (१०० कोटी), वर्ल्ड ट्रेड सेंटर नाशिक (World Trade Center Nashik) (७५० कोटी), सह्याद्री फार्म्स (Sahyadri Farms) (४५७.२ कोटी), एनएसजे ग्लोबल लॉजिस्टिक्स (NSJ Global Logistics) (१०० कोटी), ठाकरे इस्टेट (Thackeray Estate) (१५० कोटी), स्पेक्ट्रम इलेक्ट्रीक्स (Spectrum Electrics) (११० कोटी), दिलीप टेक्सटाइल्स (Dilip Textiles) (२०० कोटी) आणि ट्रायडंट ॲग्रो एक्स्पोर्ट्स (Trident Agro Exports) (११९.८५ कोटी) यांसारख्या विविध गुंतवणूक करारांचे आदान-प्रदानही करण्यात आले.

Comments
Add Comment

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच