Vietnam President To Lam : ‘एनएसई बेल’ वाजवत व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांचा भारताला आर्थिक सलाम; मुंबईतून द्विपक्षीय व्यापाराला नवी गती

मुंबई : व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम (To Lam) यांनी गुरुवारी मुंबईतील National Stock Exchange of India (NSE) मुख्यालयाला भेट देत प्रतिष्ठित ‘एनएसई बेल’ वाजवली. या भेटीद्वारे भारत-व्हिएतनाम आर्थिक संबंधांना नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे. राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी भारतीय भांडवली बाजाराची कार्यपद्धती, तांत्रिक क्षमता आणि वित्तीय व्यवस्थेची सखोल माहिती घेतली.


मुंबईतील बीकेसी येथील एनएसई मुख्यालयात राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे व्हिएतनामी प्रतिनिधीमंडळासह औपचारिक स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एनएसईचे अध्यक्ष Srinivas Injeti यांनी स्वागतपर भाषण करत भारत आणि व्हिएतनाममधील वाढत्या आर्थिक भागीदारीवर प्रकाश टाकला. यावेळी इंजेटी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची भारतातील ही पहिली अधिकृत भेट असून त्यांनी भारतीय वित्तीय क्षेत्राशी संवादासाठी एनएसईची निवड केल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत आणि व्हिएतनाम हे दोन्ही देश उत्पादन, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि भांडवली बाजाराच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहेत. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतातील एका उत्पादन प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर अवघ्या १८ महिन्यांत त्या प्रकल्पातून पहिले वाहन उत्पादन सुरू झाल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला. यामुळे भारतातील औद्योगिक गती आणि उत्पादनक्षमता जगासमोर ठळकपणे अधोरेखित झाल्याचे सांगण्यात आले. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय व्यापार सध्या १६ अब्ज डॉलरच्या पुढे पोहोचला असून २०३० पर्यंत तो २५ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट दोन्ही देशांनी ठेवले आहे. व्यापार, गुंतवणूक, डिजिटल तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर दोन्ही बाजूंनी भर देण्यात येत आहे.







कार्यक्रमानंतर राष्ट्राध्यक्ष तो लाम आणि व्हिएतनामी प्रतिनिधीमंडळाने एनएसईच्या अत्याधुनिक ट्रेडिंग व ऑपरेशन्स सुविधांची पाहणी केली. भारतीय शेअर बाजाराची डिजिटल क्षमता, व्यवहारांची गती आणि सुरक्षितता याबाबत त्यांनी विशेष रस दाखवला. या भेटीमुळे भारत-व्हिएतनाम आर्थिक संबंधांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Nepal Flood : महापुराचं थैमान ! 275 भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता, मृतांची संख्या 1344 वर

Nepal Flood : नेपाळ-तिबेट सीमेवर (Nepal-Tibet Border) २६ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे मोठं संकट

Air India Phuket Delhi Flight : एएआयबीने एअर इंडियाच्या फुकेट-दिल्ली विमानाशी संबंधित घटनेचा प्राथमिक अहवाल केला जारी

नवी दिल्ली : एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने 4 ऑगस्ट रोजी झालेल्या एअर इंडियाच्या

Driving Licence New Rules : वाहतनियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही! थेट ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द; नितीन गडकरींची नवी 'पॉइंट सिस्टीम' काय आहे ?

नवी दिल्ली : देशातील रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक शिस्त बिघडवणाऱ्या वाहनचालकांवर कठोर चाप बसवण्यासाठी

Nepal Flood : नेपाळ पूरात बेपत्ता व्यक्तींच्या ओळखीसाठी भारताची फॉरेन्सिक मदत, डीएनए तपासणी मोफत

नवी दिल्ली : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातील पीडितांची ओळख पटवण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ करण्यासाठी

Priyanka Chopra Karl Lagerfeld Award : ग्लोबल फॅशनविश्वात प्रियांका चोप्राचा डंका! पॅरिसमध्ये प्रदान करणार मानाचा 'कार्ल लेगरफेल्ड पुरस्कार'

पॅरिस : बॉलिवूड ते हॉलिवूड (Bollywood To Hollywood) असा प्रवास करणारी ‘ग्लोबल आयकॉन’ प्रियांका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas) हिने

Delhi Airport Flooded : मुसळधार पावसाने दिल्ली विमानतळ पाण्याखाली! टर्मिनलवर साचले पाणी, प्रवाशांचे हाल अन् IMD कडून 'यलो अलर्ट' जारी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा मोठा फटका