कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक परिस्थीवर मात करत पंचवटीतील एका १० विच्या विद्यार्थिनीने घवघवीत यश मिळवले आहे. प्रवास खडतर असला तरी मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते हे श्रावणीने दाखवून दिले आहे. श्रावणी हिने दहावीच्या परीक्षेत तब्बल १०० टक्के गुण मिळवत यशाचे शिखर गाठले आहे. सध्या सर्वच स्तरातुन तिचे कौतुक होत आहे. (SSC Exam Result 2026)



१०० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन


पंचवटीतील मेरी म्हसरूळ परिसरातील रहिवासी आणि सीडीओ मेरी शाळेची विद्यार्थिनी श्रावणी महेश नांदुर्डीकर या विद्यार्थिनीने दहावी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे कोणतीही शिकवणी न लावता तिने हे यश मिळवले आहे. श्रावणी हिचे वडील पेपर विक्रेते असून त्यांची परिस्थिती ही बेताचीच आहे. मात्र परिस्थितीला कारण न बनवता तिने मेहनत घेतली, आणि मोठे यश मिळवले. तिच्या या यशाचा आई वडिलांना सार्थ अभिमान असून यशामुळे ते ही भारावून गेले.


जिद्द, संयम, चिकाटी आणि बेताची आर्थिक परिस्थिती असूनही श्रावणीने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रावणीने सांगितले की सातत्यपूर्ण अभ्यास, आई-वडील आणि गुरुजनांचा आशीर्वाद तसेच सहकार्यामुळे हे यश मिळवता आले. पुढे १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन इंजिनिअरिंग करण्याचा तिचा मानस आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ ज्ञानार्जनासाठी करावा, असे आवाहनही तिने केले आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



नाशिक विभाग पाचव्या स्थानावर


आज शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. नाशिक विभागाने ९०.५३ टक्के निकालासह राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे. नाशिक विभागातून एकूण २०१९४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २०००९६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामधून १८११५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ६४००७ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी (७५ टक्क्यांपेक्षा अधिक) गुण मिळवले आहेत. तर ६६४०३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी (६० टक्क्यांपेक्षा अधिक) आणि १०,२१८ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी (३५ टक्क्यांपेक्षा अधिक) प्राप्त केली आहे. (SSC Exam Result 2026)


दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींची बाजी


मुलींची टक्केवारी ९४.९६ टक्के


मुलांची टक्केवारी: ९०.५६ टक्के


मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांची ९०.५६ टक्केवारी


 
Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''