नदीजोड प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा -ना.विखे पाटील

कोकण-गोदावरीसह चार महत्त्वाच्या योजनांचा घेतला आढावा


मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. कोकण-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी तसेच कोकण-गोदावरी वळण योजना या नदीजोड प्रकल्पांचा सविस्तर आढावा मंत्री श्री विखे पाटील यांनी आज घेतला.आयोजित बैठकीमध्ये प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेताना मंत्री विखे पाटील यांनी कामांची गती वाढवून प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरविण्याचे निर्देश दिले. राज्याच्या दीर्घकालीन जल व्यवस्थापनासाठी तसेच दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देण्यासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.


पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात प्रस्तावित हा प्रकल्प दमणगंगा आणि वैतरणा उपखोऱ्यातील अतिरिक्त उपलब्ध पाणी उर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात वळविण्यासाठी राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील अवर्षणप्रवण सिन्नर तालुक्यास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून घरगुती वापरासाठी, तसेच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडोरसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच गोदावरी नदीत पाणी सोडल्यामुळे मराठवाड्यातील प्रकल्पाच्या लाभक्षेत्रालाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.प्रकल्पांतर्गत निलमाती, मेट, कोशिमशेत, उधळे आणि बोरखिंड अशी पाच धरणे प्रस्तावित आहेत. यापैकी उधळे आणि मेट धरणांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून कोशिमशेत, निलमाती आणि बोरखिंड धरणांच्या मोजणीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. ही सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.बैठकीसाठी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह यवतमाळचे जिल्हाधिकारी, पालघर येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच वन विभागाचे अधिकारी आणि संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीने उपस्थित होते.


Comments
Add Comment

Pratap Sarnaik : स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा

Rojgar Mahakumbh : मुंबईत २९ सप्टेंबरला रोजगाराचा 'महाकुंभ'; पंडित दीनदयाळ उपाध्याय 'रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र' अंतर्गत शहरात १० ठिकाणी भव्य मेळावे

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई

Bhandara gad news : भंडारा-भामचंद्र गडाच्या सद्यस्थितीचा महिनाभरात अहवाल सादर करा; सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पावन तपोभूमी असलेल्या देहूजवळील भंडारा आणि भामचंद्र गडाच्या

Adivasi Vikas Vibhag : शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, शिक्षण आयुक्तालयाकडून १ हजार ६०० उमेदवारांची यादी प्राप्त; आदिवासी विकास विभागाकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर

मुंबई : आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित)

Eknath Shinde : रिक्षा-टॅक्सी चालकांच्या कष्टाला सन्मानाची जोड, आनंद दिघे यांच्या नावाने उभे राहिलेले महामंडळ देशासाठी आदर्श; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : दिवसभर अथक परिश्रम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार

BMC Corporators Tablet : नगरसेवकांच्या हाती टॅब पडण्यापूर्वी खरेदीची फाईल बंद; ऍपलच्या टॅबवरील खर्चाचा आकडा पाहून प्रशासनाने घेतला आखडता हात?

मुंबई (सचिन धानजी) : मुंबइ महापालिकेतील कारभार पेपरलेस करण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने नगरसेवकांना टॅब