मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत शोकाकुल आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेमुळे डहाणूतील बापूगाव गावावर दुःखाचे मोठे सावट पसरले असून, संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. या सामूहिक अंत्यविधीच्या वेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी स्वतः उपस्थित राहून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली व पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले.अंत्यविधीदरम्यान संपूर्ण बापूगाव आणि परिसरातील नागरिक भावुक झाले होते. ग्रामस्थांचे अश्रू थांबत नव्हते. बापूगावच्या सरपंचांनीही यावेळी अश्रूंना वाट मोकळी करून देत, या अत्यंत गरीब आणि गरजू मृत कुटुंबांना शासनाने तातडीने मोठी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.



दुःखात बुडालेल्या ग्रामस्थांशी संवाद साधताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांप्रती सखोल सहानुभूती दर्शविली आहे. अपघातातील जखमींवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार केले जात असून, त्यांच्या नातेवाईकांसाठी रुग्णालयात ये-जा करण्यासह सर्व आवश्यक सुविधा प्रशासनामार्फत मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आदिवासी विकास विभाग पूर्णपणे 'पालकत्वाची' भूमिका निभावेल आणि त्यांना आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल.


परिसरात हळहळ


या सामूहिक अंत्यसंस्काराला मृतांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि कुटुंबीयांना धीर देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा उपस्थित होती. यामध्ये खासदार हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावीत, आमदार विनोद निकोले, माजी आमदार विलास तरे स्थानिक नेते भरत राजपूत, जिल्हाधिकारी, एटीसी अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या भीषण अपघाताने केवळ बापूगावच नव्हे, तर संपूर्ण पालघर जिल्हा हादरला आहे. पीडित कुटुंबांना या अथांग दुःखातून सावरण्यासाठी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थाही मोठ्या संख्येने पुढे येत आहेत.

Comments
Add Comment

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच