Prasad Lad : प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा निर्माण होऊ पाहणारा आंदोलनाचा संघर्ष टाळण्यासाठी शासन आणि आंदोलनकर्ते यांच्यात पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेले जाहीर निमंत्रण स्वीकारत, भाजपचे वरिष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड उद्या, शुक्रवारी (२२ मे) थेट जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये उद्या सकाळी साडेदहा वाजता अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक बैठक होणार असून, त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून पुन्हा एकदा 'आमरण उपोषणाची' घोषणा केली आहे. मात्र, त्यापूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांनी "सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून चर्चेतून मार्ग काढू," असे विधान केले होते. या विधानाचा संदर्भ घेत जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेतून लाड यांना चर्चेचे निमंत्रण दिले होते.


आमदार प्रसाद लाड हे उद्या, २२ मे रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून आंतरवली सराटीकडे प्रयाण करतील. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता आंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील आणि लाड यांच्यात वैयक्तिक व सविस्तर चर्चा होईल. या भेटीदरम्यान राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत नेमका काय सकारात्मक तोडगा काढला जाऊ शकतो, यावर विस्तृत खलबते होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.