High Speed Train : नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेसाठी रघुवीर खेडकर यांचे अमित शाह यांना साकडे

नवी दिल्ली : लोककला क्षेत्रात कार्यरत असल्याने सातत्याने लोकांमध्ये वावरत असतो, त्यामुळे जनतेचा सांस्कृतिक प्रतिनिधी या नात्याने पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या तमाशा महर्षी रघुवीर खेडकरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी नाशिक पुणे हायस्पीड प्रकल्पाचा नव्याने विचार करण्याची तसेच या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करण्याची विनंती केली.



पद्म पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तमाशा महर्षी रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. यानंतर झालेल्या सोहळ्यात खेडकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.



खेडकरांच्या गावातून जाणारा नाशिक पुणे हायस्पीड प्रकल्प तांत्रिक कारणामुळे रद्द झाला आहे. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, आपण रेल्वे मंत्रालयाशी बोलून योग्य तोडगा काढावा अशी विनंती खेडकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केली.


महाराष्ट्रातील तमाशा कलाकारांपुढील प्रश्नाबाबतही त्यांनी अमित शाह यांना स्वतंत्र निवेदन दिले. महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशा कलाकारांवर वारंवार हल्ले होतात, काही मोजकी गावे सोडली तर बहुतांश ठिकाणी पोलीस प्रशासनाचे तमाशाला अजिबात सहकार्य मिळत नाही. ज्या ज्या वेळी पोलिसांची मदत घेण्याची वेळ येते तेव्हा कुणाच्यातरी वशिल्याशिवाय पोलीस प्रशासन सहकार्य करत नाही. याबाबत आपण राज्य सरकारमार्फत पोलिसांना सक्त सूचना द्याव्यात असेही खेडकर यांनी अमित शाह यांना सांगितले.


संगमनेरचा जबाबदार नागरिक आहे आणि लोकांचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून ही दोन निवेदनं देत असल्याचे खेडकर यांनी अमित शाह यांना सांगितले. तमाशा व्यवसायातील जबाबदार घटक म्हणून कलेपुढील आव्हाने केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगितल्याचे रघुवीर खेडकर म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री निवेदनांचा सकारात्मक विचार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?