MLC Election : विधानपरिषदेच्या १५ जागांवर भाजप वरचढ

 शिवसेना-राष्ट्रवादीकडे केवळ एकेका जागेवर बहुमत; पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत मोठी चढाओढ


मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्धार तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी व्यक्त केला असला, तरी प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहता भाजप अत्यंत वरचढ स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. १७ पैकी तब्बल १५ जागांवर भाजपचे पारडे जड असून, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडे केवळ एकेका जागेवरच बहुमत आहे. विशेष म्हणजे, हायव्होल्टेज ठरणाऱ्या पुणे मतदारसंघावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठी चढाओढ सुरू आहे.


या पार्श्वभूमीवर, महायुतीचा अंतिम तोडगा दिल्लीत निघणार असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यानंतरच जागावाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. मतदारसंघांमधील मतांचे गणित आणि राजकीय ताकदीचा आढावा घेतल्यास, १४ ठिकाणी भाजपकडे बहुमताचा जादुई आकडा आहे. त्यामुळे महायुतीत भाजपच 'मोठा भाऊ' असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. दुसरीकडे, शिंदे यांच्या शिवसेनेला 'रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग' आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'परभणी-हिंगोली' या एकमेव मतदारसंघात स्वबळावर सत्ता राखता येईल.



पुणे मतदारसंघात एकटा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (३७५ मते) मोठा दिसत असला, तरी भाजप (३३५) आणि शिवसेना (८२) यांची एकत्रित मते राष्ट्रवादीपेक्षा जास्त आहेत. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याचा दाखला देत भाजपने या जागेवर दावा ठोकला आहे. दुसरीकडे, कोकणातील 'रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग' या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात स्वतःचे बहुमत असतानाही, राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा अनिकेत तटकरेंसाठी मागत आहे. या बदल्यात शिवसेनेने राष्ट्रवादीकडे 'परभणी-हिंगोली'च्या जागेची मागणी केल्याने जागांच्या अदलाबदलीची नवी समीकरणे समोर येत आहेत.


भाजपकडून सामंजस्याची भूमिका

सद्यस्थितीतील आकडेवारीनुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला १, शिवसेनेच्या वाट्याला १ आणि उर्वरित १५ जागांवर भाजपचा वरचष्मा दिसत आहे. मात्र, मित्रपक्षांमध्ये नाराजी निर्माण होऊ नये म्हणून भाजपने समजूतदारपणाची भूमिका घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने स्वतःच्या कोट्यातील जागा कमी करत शिवसेनेला एकाऐवजी ४ जागांची सन्मानजनक ऑफर दिली आहे.

संख्याबळावर नजर


मतदारसंघ - एकूण मते - भाजप - शिवसेना (शिंदे) - राष्ट्रवादी (अजित पवार)


१. ठाणे - 997 - 431 - 309 - 18
२. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 823 - 241 - 275 - 149
३. अहिल्यानगर - 452 - 207 - 44 - 64
४. जळगाव - 667 - 274 - 208 - 55
५. नाशिक - 603 - 186 - 161 - 107
६. सोलापूर - 617 - 304 - 76 - 48
७. सांगली-सातारा - 898 - 371 - 110 - 145
८. पुणे - 878 - 335 - 82 - 375
९. यवतमाळ - 446 - 135 - 104 - 29
१०. भंडारा-गोंदिया - 436 - 196 - 15 - 83
११. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली - 264 - 149 - 1 - 15
१२. अमरावती 449 136 23 83
१३. नांदेड 403 103 23 83
१४. धाराशिव-लातूर-बीड 904 379 80 202
१५. परभणी-हिंगोली 473 111 74 123
१६. छ. संभाजीनगर-जालना 646 254 139 86
१७. नागपूर (पोटनिवडणूक) - 794 - 501 - 30 - 5

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''