जगातील पहिली डोपिंग फ्रेंडली स्पर्धा; ड्रग्ज-स्टेरॉइड्सना परवानगी, क्रीडा विश्वात खळबळ...

Use of Doping : लास व्हेगासमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एनहॅन्स्ड गेम्स (Enhanced Games) या स्पर्धेमुळे क्रीडा विश्वात मोठा वाद निर्माण झाला आहे. पहिल्यांदाच स्पर्धेत खेळाडूंना ड्रग्ज, स्टेरॉइड्स आणि हार्मोन्स घेण्यास उघडपणे परवानगी देण्यात आली आहे. या स्पर्धेत ४२ आंतरराष्ट्रीय जलतरणपटू (swimmer), धावपटू (Sprinter) आणि वेटलिफ्टर्स (Weightlifters) सहभागी होणार आहेत.


या स्पर्धेमागे अब्जाधीश बायो-हॅकर ख्रिश्चन एंगरमेयर (Bio-hacker Christian Angermaye) यांचा मोठा सहभाग आहे , त्यांनी बायो-हॅकिंगच्या माध्यमातून खेळाडूंची क्षमता वाढवण्याचा दावा केला आहे. अनेक ऑलिम्पिक खेळाडूंनीही या स्पर्धेत सहभाग घेतल्याने चर्चांना अधिक उधाण आले आहे. ग्रीकचा जलतरणपटू क्रिस्टियन गोलोमेवने (Christian Golomevne) पन्नास मीटर फ्रीस्टाइलमध्ये २०.८९ सेकंदांची वेळ नोंदवत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यासाठी त्याला तब्बल ९.५५ कोटी रुपयांचे बक्षीसही देण्यात आले आहे. एनहॅन्स्ड गेम्स कंपनीचे मूल्यांकन सुमारे ११,४६० कोटी रुपये इतके आहे. सिलिकॉन व्हॅलीतील गुंतवणूकदार आणि ट्रम्प ज्युनियर यांच्या '१७८९ कॅपिटल फर्म'ने या प्रकल्पात गुंतवणूक केली आहे. कंपनी भविष्यात टेस्टोस्टेरॉन आणि अँटी-एजिंग सप्लिमेंट्स विकण्याचा विचार केला आहे.



खेळाच्या माध्यमातून बिझनेसचे साम्राज्य


अब्जाधीश पीटर थिएल आणि ट्रम्प ज्युनियर यांनी संयुक्तपणे '१७८९ कॅपिटल फर्म'ची स्थापना केली आहे. या फर्मनेच ११,४६० कोटी रुपयांच्या मार्केट व्हॅल्यूसह एनहॅन्स्ड गेम्सची सुरुवात केली आहे. अँगरमेयर (Angermeyer) याचे सह-संस्थापक आहेत. व्यEवसायिक साम्राज्य उभे करण्यासाठी खेळाचा थेट फायदा घेण्यात आला आहे. या कार्यक्रमात तब्बल १९१ कोटी रुपयांची गंतवणूक करण्यात आली आहे. कंपनीचे टेलीहेल्थ प्लॅटफॉर्म एनहॅन्स्ड लवकरच सामान्य लोकांनाही टेस्टोस्टेरॉन आणि अँटी-एजिंग सप्लिमेंट्स विकेल. जगभरातील ६५० लाख कोटी रुपयांच्या वेलनेस उद्योगाचा फायदा घेण्यासाठी या स्पर्धेने थेट जाहिरात म्हणून भूमिका बजावली.या स्पर्धेवर जागतिक स्तरावर तीव्र टीका होत आहे. अमेरिकन अँटी-डोपिंग एजन्सीचे प्रमुख ट्रॅव्हिस टायगार्ट यांनी यामुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश जाईल, अशी चिंता व्यक्त केली. वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सीनेही अशा औषधांमुळे हार्टअटॅक , स्ट्रोक आणि अचानक मृत्यूचा धोका वाढू शकतो, असा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

BCCI Clarification : रोहित शर्माच्या टीम इंडियातील स्थानाला धोका नाही; बीसीसीआय सचिवांकडून अफवांना पूर्णविराम

मुंबई : भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माला वनडे संघात स्थान देण्याबाबत काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित होत

VVS Laxman : व्हीव्हीएस लक्ष्मण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चे (सीओई) क्रिकेट संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण हे जपानमधील आइची-नागोया

Asian Games 2026 : आशियाई खेळांसाठी दुखापतग्रस्त नीरज चोप्राच्या जागी यशवीर सिंगला संधी

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता भालाफेकपटू यशवीर सिंगचा, दुखापतग्रस्त नीरज

China Masters : किदाम्बी श्रीकांतची आगेकूच कायम, तन्वी शर्माचे आव्हान संपुष्टात

शेन्झेन (चीन) : किदाम्बी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या व्हिक्टर लाईला पराभूत करत चायना

ICC Women's Champions Trophy 2027 : पहिली आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात होणार

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले की, पहिली आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ ही

India Asian Games 2026 Squad : क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई खेळांसाठी ५०३ खेळाडू आणि २४६ सहाय्यक कर्मचाऱ्यांना मंजुरी

नवी दिल्ली : आशियाई खेळांसाठी ५०३ भारतीय खेळाडू, २४६ संघ अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे पथक जपानला जाणार आहे.