मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे! आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक 2027 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ही रोमांचक स्पर्धा यंदा 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान बांगलादेश आणि नेपाळच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत जगातील सोळा दिग्गज संघ एकूण 41 सामन्यांमध्ये एकमेकांशी भिडणार असून, दोन वेळचे जेतेपद पटकावणारा भारतीय संघ 22 जानेवारी रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या मोहिमेला दणक्यात सुरुवात करणार आहे.
बांगलादेश आणि नेपाळमध्ये रंगणार विश्वचषकाचा थरार
या स्पर्धेतील सर्व सामने बांगलादेशातील चट्टोग्राम आणि सिल्हेट तसेच नेपाळची राजधानी काठमांडू येथील चार प्रमुख मैदानांवर खेळवले जातील. यामध्ये चट्टोग्रामचे वीर श्रेष्ठ शहीद फ्लाइट लेफ्टनंट मतिउर रहमान क्रिकेट स्टेडियम, सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, काठमांडूचे टीयू आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि अप्पर मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा समावेश आहे. स्पर्धेची सुरुवात 21 जानेवारी रोजी चार दमदार सामन्यांनी होईल. पहिल्या दिवशी बांगलादेशचा सामना संयुक्त अरब अमिरातीशी, तर ऑस्ट्रेलियाचा सामना नायजेरियाशी होणार आहे.
Our Title Defence Begins Here 🏆🇮🇳
Here are #TeamIndia’s group-stage fixtures for the ICC Women’s T20 #U19WorldCup 2027, which will be followed by the Super Six, Semis and the Final 🗓️ https://t.co/jOqWWZbXwz
— BCCI Women (@BCCIWomen) October 21, 2026
नागोया (जपान) : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत देशाच्या पदकतालिकेत भर घातली आहे. 21 ...
चार गटांत 16 संघांची अग्निपरीक्षा
स्पर्धेसाठी एकूण 16 संघांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
गट 'अ': भारत, आयर्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ
गट 'ब': दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, सामोआ
गट 'क': ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नायजेरिया, संयुक्त अरब अमिराती
गट 'ड': इंग्लंड, श्रीलंका, अमेरिका, स्कॉटलंड
यजमान नेपाळ आपला पहिला सामना 22 जानेवारी रोजी आयर्लंडविरुद्ध खेळेल. याच दिवशी भारतीय संघ काठमांडू येथे वेस्ट इंडिजशी भिडणार आहे. गट फेरीचे सामने 26 जानेवारीपर्यंत चालतील.
16 teams 👊
41 matches 🏏
The ICC Women's T20 #U19WorldCup 2027 fixtures are confirmed 🤩
More ➡️ https://t.co/atd1WxBfo1 https://t.co/qJm6ynKda4
— ICC (@ICC) October 21, 2026
सुपर सिक्स आणि महाअंतिम सोहळा
गट फेरीनंतर पात्र ठरलेले संघ सुपर सिक्स टप्प्यात प्रवेश करतील. यातून अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहचतील. 4 फेब्रुवारी रोजी चट्टोग्राम येथे दोन्ही उपांत्य सामने खेळवले जातील, तर स्पर्धेचा महाअंतिम सामना 6 फेब्रुवारी रोजी होणार असून यासाठी 7 फेब्रुवारी हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी सांगितले की, युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी हा विश्वचषक एक सोनेरी संधी आहे.