Ashok Kharat : भोंदू अशोक खरातपाठोपाठ राज्यातील 'या' 50 भोंदूंवर कारवाई , कारवाईत नाशिकचे सर्वाधिक भोंदू

नाशिकमधील भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरण आले आणि या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवाले. खरात प्रकरण समोर येताच राज्यातील इतर भागातूनही भोंदूबाबा संबंधित तक्रारी समोर येण्यास सुरुवात झाली. खरात पाठोपाठ सव्वा दोन महिन्यांतच पोलिसांनी राज्यातील ५० भोंदूबाबांवर कारवाई करत त्यांचे दरबार उधळून लावले आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वांधिक ५ गुन्हे हे नाशिक (Nashik) जिल्ह्यात दाखल झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभागाच्या कार्यवाह रंजना गवांदे व सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी दिली आहे. राज्यकार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी या गुन्ह्यांची यादी संकलित केली आहे.



पुरोगामी महाराष्ट्र, भोंदू सर्वत्र


अशोक खरात प्रकरणात ज्या प्रमाणे महिला अत्याचार घडल्याचे समोर आले होते तसेच राज्यातील इतर ५० प्रकरणांपैकी बहुतांश प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. नाशिक येथे घडलेल्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर अवघ्या दोन महिन्यात राज्यात एकुण ५० गुन्हे दाखल झाले आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. ही प्रकरणे काही ठिकाणी स्वतःहून तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नाने समोर आली आहेत.



शाररिक शोषणासह आर्थिक लुट


भोंदूबाबा फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे या ५० प्रकरणांतून समोर आले आहे. महिलांच्या शाररिक शोषणासह महिला व पुरुष यांची मोठ्या प्रमाणात आथिर्क फसवणूक झाल्याचे या घटनांमधून समोर आले आहे. भितीपोटी व सामाजिक प्रतिष्टेपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत आहे. खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. त्यांना या प्रकरणात न्यायाची अपेक्षा देखील आहे.


अंधश्रद्धेमुळे होणारी समाजातील फसवणूक रोखण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १८ वर्ष लढा दिला. या संघर्षानंतर २०१३ मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३’ हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा बनविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते.



हे गुन्हे जादूटोणा विरोधी कायदा किंवा इतर कायद्याच्या कलमाखाली दाखल झालेले आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपशील पुढील प्रमाणे:


१) अशोक कुमार खरात , नाशिक


२) गडगेबाबा राजेंद्र गडगे, संगमनेर , अहिल्यानगर


३) चेतन सुनील माळी,मूर्तिजापूर, अकोला


४) पंकज देवराम घोलप, येडगांव, पुणे


५)मोहन मामा भोसले, कुर्डुवाडी, सोलापूर


६)नाना बर्डे , आळे फाटा , पुणे


७) ऋषिकेश वैद्य ,वसई ,मुंबई


८) अल्ताफ रईस खान ,मालाड, मुंबई


९) रिधम पांचाळ, मालाड, मुंबई


१०) गणेश शिंदे ,श्रीरामपुर, अहिल्यानगर


११) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा , नवी मुंबई


१२)विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक


१३)किसन तळपे मंदोशी, खेड


१४ ) महेशगिरी उर्फ महेश काकडे,लासलगाव ,नाशिक


१५) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड


१६) इरफान नियाज अहमद , कांदिवली , मुंबई


१७) अनिल सोलोमन सिंग ( पादरी), पुणे


१८)शिवराम पराश सावर, पालघर


१९)अल्ताफ हसन मदारी, जळगाव


२०)नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर, टेंभुर्णी, सोलापूर


२१) पिंटू धुमाळ बारामती, पुणे


२२) हेमदास किसन बावणे,अड्याळ,भंडारा


२३) चंद्रकांत राजेंद्र माळी , इगतपुरी, नाशिक


२४) अशोक मधुकर आढाव, श्रीरामपूर,अहिल्यानगर


२५) औदुंबर गडदे, स्वारगेट, पुणे


२६)नवनाथ गवळी, खेड, पुणे


२७) शाहिद शेख, खडकपाडा,कल्याण


२८) शिव भाऊ सोनवणे, सर्जेपुरा, अहिल्यानगर


२९) ज्ञानेश्वर नागोराव कोरडे, बिलोली, नांदेड


३०) रमेश गुप्ता , मालाड , मुंबई


३१)हरिगिरी दत्तगिरी महाराज , भाग्यनगर, नांदेड


३२) मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित , ठाणे


३३) कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते, पश्चिम देवपूर, धुळे


३४) यशवंत एकनाथ थोरात, पारनेर, अहिल्यानगर


३५) श्याम महाराज राठोड , दिघी , पुणे


३६) सुधाकर गाडगे, बाळापूर , अकोला


३७) परमेश्वर उर्फ प्रमोद बाळू गायकवाड, उत्तमनगर, पुणे


३८) शितल सालके व पोर्णिमा सारस्वत भारती विद्यापीठ, पुणे


३९) योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार, निजामपूर, साक्री, धुळे


४०) विठ्ठल पवार, महागाव, यवतमाळ


४१) ताहीर रशीद बेग, सक्करदरा, नागपूर


४२) सुधाकर रमेश काळे, अंजनगाव सुर्जी, अमरावती


४३) अशोक रामधन राठोड, वडगाव (जंगल) , यवतमाळ


४४)महेश मोहन बाबर, विटा, सांगली


४५) कमलेश महाराज अधिकारी, इंदिरानगर, नाशिक


४६)परवेज अब्दुल अजीज मेमन , कोंढवा, पुणे


४७) गंगाधर बुरांडे, सावली, चंद्रपूर


४८) भीमराव पुंजाराम बिहाडे, संभाजीनगर


४९) मुक्तानंदगिरी महाराज उर्फ बापू महाराज,कन्नड, संभाजीनगर


५०) राजू बन्सी दिवटे, पारनेर, अहिल्यानगर.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली