Pune Crime : पुण्याच्या करडे घाटात गोळीबार, गँगस्टर ठार

पुणे : पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. ताजी घटना शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरातली आहे. घाटात एक भयंकर प्रकार घडला आहे. दोन गुंडांच्या टोळ्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. दोन्ही बाजूच्या गुंडांमध्ये तुफान हाणामारी झाली. मारामारीचे रूपांतर गोळीबारात झाले. या गोळीबारात एका गँगस्टरचा मृत्यू झाला.



पोलीस गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे सांगत असले तरी स्थानिक काही भागांमध्ये गुन्हेगारीचा त्रास प्रचंड प्रमाणात होत असल्याची तक्रार करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिरूर तालुक्यातील करडे घाटात संध्याकाळी सातच्या सुमारास हिंसक संघर्ष झाला. दोन गुंडांच्या टोळ्या एकमेकांच्या वाहनांचा पाठलाग करत घाटात पोहोचल्या. घाटात दोन्ही टोळ्यांच्या वाहनांनी एकमेकांना जोरदार धडक दिली. यानंतर रस्त्यावर उतरून आधी शा‍ब्दिक वाद घातला. वाद वाढला आणि काही गुंडांनी एकमेकांवर गोळीबार केला. या गोळीबारात एका गुंडाचा मृत्यू झाला.



गोळीबाराचे आवाज ऐकून घाट परिसरात असलेल्या काही जणांनी घाबरून आहेत तिथेच थांबून पोलिसांशी संपर्क केला. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत एकाचा मृत्यू झाला होता. पोलीस येत असल्याचे बघून गुंड पळून गेले. आता घाटातील हिंसेप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.


याआधी काही दिवसांपूर्वी शिरूरचे नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्याकांडात विशाल काळे आणि सनी यादव या दोन आरोपींना जामीन मिळाला. आरोपी सनी यादव आणि विशाल काळे या दोघांवर कुठल्यातरी मुद्यावरून वाद होता. याच वादातून दोन्ही गुंड आणि त्यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष झाला. या संघर्षात विशाल काळेचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता पोलीस तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.