गावाला जाते म्हणून निघायची, अन् गर्दीचा फायदा घेत महिला करायची 'हे' कांड

कोल्हापूर : कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका महिलेचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, घरची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही ही महिला विविध शहरांतील बसस्थानकांवर जाऊन सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारत असल्याचे तपासात समोर आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिला पुणे शहरातून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलाने आपल्या गावी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडत होती. त्यानंतर ती अक्कलकोट, इस्लामपूर, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरसह विविध शहरांतील गर्दीच्या बसस्थानकांवर जात असे. गर्दीचा फायदा घेत ती महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्याचे प्रकार करत असल्याचे उघड झाले आहे.



मागील आठवड्यात २४ मे रोजी कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात मोठी गर्दी होती.याच गर्दीचा फायदा घेत एसटी बसमध्ये चढताना दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे चोरीला गेली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला.

पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित महिलेचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी पुण्यातून आरोपी महिलेला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये तिने चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईत पोलिसांनी तिच्याकडून २ लाख ८९ हजार ८०० रुपये किमतीची दोन सोन्याची मंगळसूत्रे जप्त केली आहेत. जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्याचा छडा लागल्याने पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे. आरोपी महिलेचे इतर चोरीच्या घटनांशी संबंध आहेत का, तसेच ती कोणत्याही टोळीशी जोडलेली आहे का, याचा तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची