Crime News : समलैंगिक प्रेम प्रकरणाचा धक्कादायक शेवट! 'ते' सत्य समोर येताच घडलं भयंकर; गडचिरोलीत तरुणाची हत्या

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  सोशल मीडियावरील ओळखीतून सुरू झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, मात्र त्याच नात्याचा शेवट एका हत्येत झाल्याची घटना समोर आली आहे. एटापल्ली-जरावंडी मार्गावर एका ३२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मृत तरुणाचे नाव सतीशकुमार जगदीशप्रकाश निसाद (रा. नागेपल्ली, ता. अहेरी) असे आहे. तर सूरज हलदार या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीशकुमार हे नागेपल्ली येथे गॅरेज व्यवसाय करत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून सूरज हलदार याच्याशी ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. दोघे ही नियमित संपर्कात असल्याने त्यांच्यात समलैंगिक प्रेम संबंध निर्माण झाले आणि कालांतराने त्यांचे संबंध अधिक घट्ट झाले.



दरम्यान, ओडिशामध्ये राहणारा सूरज काही दिवसांपूर्वी सतीशकुमार यांना भेटण्यासाठी गडचिरोलीत आला होता. दोघे काही दिवस एकत्र राहिले. याच काळात एक धक्कादायक माहिती सुरजच्या हाती लागली. सतीशकुमार यांचे लग्न झाल्याचे त्याला समजले. याच कारणामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला. रविवारी पहाटे सूरज आपल्या गावी परत जाण्याच्या तयारीत असताना दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला.

वाद वाढल्यानंतर सूरजने संतापाच्या भरात धारदार शस्त्राने सतीशकुमार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

या प्रकरणी आरोपी सूरज हलदार याला अटक करण्यात आली असून हत्येमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.
Comments
Add Comment

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची