Indian Railways News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC च्या ८०० हून अधिक बेस किचनवर AI कॅमेऱ्यांचा २४ तास पहारा

नवी दिल्ली (IRCTC AI Cameras) : रेल्वे स्थानकांवर आणि प्रवासी गाड्यांमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत वारंवार तक्रारी येत असतात. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC) ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. देशभरातील IRCTC च्या बेस किचनवर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेऱ्यांद्वारे चोवीस तास नजर ठेवली जात आहे.


८०० हून अधिक किचनमध्ये (Kitchen) २,३९४ AI कॅमेरे


IRCTC ने देशभरातील ८०० पेक्षा अधिक बेस किचनमध्ये तब्बल २,३९४ AI-सक्षम कॅमेरे बसवले आहेत. हे कॅमेरे केवळ देखरेख करत नाहीत, तर अन्न तयार करताना होणाऱ्या ९ प्रकारच्या नियमभंग आणि स्वच्छतेतील त्रुटी स्वयंचलितपणे ओळखतात.



कोणत्या बाबींवर ठेवली जाते नजर?


- कर्मचाऱ्यांनी हेअरनेट (Hair Net) किंवा पारदर्शक ग्लव्स (Gloves) न वापरणे
- किचनमध्ये स्वच्छतेचा अभाव असणे
- अन्न उघड्यावर किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवणे
- उंदीर, माश्या किंवा झुरळांचा वावर
- अन्न हाताळताना स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन


विशेष म्हणजे, अवघ्या ७ ते ८ मिलिमीटर आकाराचा कीटकही हे AI कॅमेरे शोधू शकतात.



नियमभंग झाल्यास २ तासांत कारवाई


किचनमध्ये कोणतीही त्रुटी किंवा अस्वच्छता आढळल्यास AI प्रणाली संबंधित किचन व्यवस्थापकाला तत्काळ अलर्ट पाठवते. वेळेत सुधारणा न झाल्यास प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवले जाते. साधारणपणे नियमभंग आढळल्यानंतर २ तासांच्या आत संबंधित व्यक्ती किंवा कंत्राटदारावर कारवाई केली जाते. सध्या या यंत्रणेमुळे दररोज सरासरी ३५० अलर्ट निर्माण होत आहेत. गेल्या एका महिन्यात एकूण १३,५५० अलर्ट नोंदवले गेले. यामध्ये उत्तर विभागातून सर्वाधिक ४,१२३ तर दक्षिण विभागातून सर्वात कमी १,२०९ अलर्ट प्राप्त झाले.


१० टक्के अलर्ट तांत्रिकदृष्ट्या चुकीचे


AI प्रणाली अत्यंत संवेदनशील असल्याने काही वेळा अंदाजे १० टक्के अलर्ट चुकीचेही ठरतात. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याने हेअरनेट घातले असले तरी ते व्यवस्थित न दिसल्यास AI त्याला नियमभंग मानून अलर्ट जारी करू शकते.



दरवर्षी ६० कोटी प्रवाशांना सेवा


सध्या १,४५३ रेल्वे गाड्यांमध्ये IRCTC कडून खानपान सेवा पुरवली जाते. दरवर्षी सुमारे ६० कोटी प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. मागील ५ वर्षांत अन्नाच्या गुणवत्तेसंदर्भात १९,००० हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, अन्नाच्या गुणवत्तेबाबत रेल्वे मंत्रालयानेही कठोर भूमिका घेतली आहे. नुकतेच पाटणा-टाटानगर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये निकृष्ट दर्जाचे दही पुरवल्याप्रकरणी IRCTC वर १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच संबंधित अन्नपुरवठादार कंपनीवरही ५० लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी IRCTC कडून AI तंत्रज्ञानाचा वापर हा एक महत्त्वाचा आणि दूरगामी निर्णय मानला जात आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि