हजारांच्या पगारापासून कोट्यवधींची संपत्ती? ओडिशातील अभियंत्याच्या ठिकाणी छापे, २ कोटींची रोकड जप्त

ओडिशामध्ये (odisha) भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) एका सरकारी अभियंत्याच्या मालमत्तांवर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत बँक लॉकरमधून तब्बल २ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.


कंदामाल जिल्ह्यातील बालिगुडा येथील आयटीडीएचे सहाय्यक कार्यकारी अभियंता बैकुंठनाथ बेहेरा यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार भुवनेश्वर, बालासोर, जाजपूर आणि बालिगुडा येथील एकूण ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.


तपासादरम्यान बेहेरा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या ५ बहुमजली इमारतींचा शोध लागला. यामध्ये भुवनेश्वरमधील मोठ्या चार मजली इमारतीचाही समावेश आहे. याशिवाय १३ भूखंडांची माहितीही समोर आली असून त्यापैकी ७ प्लॉट्स भुवनेश्वरमधील महत्त्वाच्या भागात असल्याचे सांगितले जात आहे.


अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बेहेरा यांनी १९९९ मध्ये केवळ ६ हजार रुपये मासिक वेतनावर कनिष्ठ अभियंता म्हणून सरकारी सेवेत प्रवेश केला होता. त्यानंतर विविध विभागांमध्ये काम करत त्यांनी नुकतीच सहाय्यक कार्यकारी अभियंता पदावर बढती मिळवली होती.


या कारवाईदरम्यान त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावरील बँक लॉकरची तपासणी करण्यात आली. लॉकर उघडताच त्यामध्ये २ कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली. याआधी घराच्या झडतीत २.६६ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली होती.


सध्या सोन्याचे दागिने, बँक ठेवी, गुंतवणूक, शेअर्स आणि इतर मालमत्तांचे मूल्यांकन सुरू आहे. तसेच जमिनी आणि इमारतींचे बाजारमूल्य निश्चित करण्याचे कामही सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर बेहेरा यांच्या एकूण मालमत्तेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?