Israel - Hezbollah War : इस्रायलकडून हिजबुल्लाहच्या १५० ठिकाणांवर भीषण हल्ले; ब्रिगेडियर जनरल, कॅप्टनसह १२ जणांचा मृत्यू

इस्रायलच्या सैन्याने दक्षिण लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या सुमारे १५० ठिकाणांवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. मध्यस्थीच्या चर्चांना वेग आला असतानाही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू माघार घेण्याच्या भूमिकेत नसल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंमध्ये अटींसह युद्धविरामावर सहमती झाल्याच्या काही दिवसांतच दक्षिण लेबनानमध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लेबनानी सैन्याचे वरिष्ठ अधिकारीही आहेत. (Israel - Hezbollah War)


लेबनानच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, खारदाली-नबातियेह मार्गावर लष्करी वाहनावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात एका ब्रिगेडियर जनरल, एका कॅप्टन आणि एका सैनिकाचा मृत्यू झाला. दुसरीकडे, इस्रायली सैन्याने हा हल्ला “सक्रिय युद्धक्षेत्रात” करण्यात आल्याचे म्हटले आहे. लेबनानी सैन्याने आरोप केला की, इस्रायलकडून वारंवार आणि जाणीवपूर्वक केले जाणारे आक्रमण कोणत्याही शांततापूर्ण तोडग्यापर्यंत पोहोचण्याच्या सर्व प्रयत्नांना हाणून पाडण्याच्या उद्देशाने केले जात आहे. (Israel - Hezbollah War)



लेबनानचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना तो लेबनानच्या सार्वभौमत्वाचे तसेच आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तसेच, लेबनानचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनीही या कारवाईचा निषेध नोंदवला आहे. एका निवेदनात पंतप्रधान नवाफ सलाम यांनी ब्रिगेडियर जनरल वस्साम सबरा, कॅप्टन एली खौरी आणि सैनिक हुसेन गोजल यांच्या कुटुंबीयांप्रती तसेच लेबनानी सैन्याप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. (Israel - Hezbollah War)


यापूर्वीही इस्रायलच्या हवाई दलाने लेबनानमधील पूर्वेकडील बेका खोरे आणि हिजबुल्लाहशी संबंधित इतर ठिकाणांवर हल्ले केले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनानमधील दहशतवादी गटांवरील कारवाया आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. (Israel - Hezbollah War)



नेतन्याहू यांची ही भूमिका अशा वेळी समोर आली होती, जेव्हा हिजबुल्लाहने अलीकडच्या आठवड्यांत दक्षिण लेबनान आणि उत्तर इस्रायलमधील इस्रायली सैन्याच्या ठिकाणांवर फायबर-ऑप्टिक तंत्रज्ञानयुक्त ड्रोनच्या साहाय्याने हल्ले केल्याचा दावा करण्यात आला होता. (Israel - Hezbollah War)

Comments
Add Comment

Goldy Brar News: अमेरिका-कॅनडाच्या मोस्ट वॉन्टेड यादीत गोल्डी ब्रार! पकडण्यासाठी 8.5 कोटींचे बक्षीस

Goldy Brar: लॉरेन्स बिश्नोई गँगमधील कुख्यात गुंड गोल्डी ब्रार याला अमेरिकेच्या 10 मोस्ट वॉन्टेड फरार आरोपींच्या स्थान

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक, कमी व्याजदरावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हची केली कानउघाडणी

मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या कमी व्याजदरांची प्रशंसा केली असून अमेरिकेच्या

NVIDIA Chip Smuggling : NVIDIA चे माजी वरिष्ठ अधिकारी जय पुरी यांच्या पत्नीचा चिप तस्करी प्रकरणाशी संबंध ? मडी वॉटर्सच्या अहवालाने तंत्रज्ञान विश्वात खळबळ

नवी दिल्ली : एआय (AI) क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मानल्या जाणाऱ्या 'एनव्हीडिया'चे (Nvidia) माजी वरिष्ठ अधिकारी अजय के.

अमेरिकेतील एका निर्णयामुळे सोन्याच्या दरात पडझड? सोन्याचे दर 10 हजारांनी कमी झाले...

मुंबई: नोव्हेंबर महिन्यामध्ये सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण होताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजकडून

बांगलादेशमध्ये पुन्हा आगडोंब, राजधानी ढाकामध्ये नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ

मुंबई: बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडताना दिसत आहे. बांगलादेशच्या माजी

26 अब्ज किमी दूर पोहोचला व्हॉयजर-1! 49 वर्षे वीज कुठून मिळते? NASA च्या यानाने रचले इतिहासातील अनेक विक्रम

अंतराळ विश्वातून एक ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. NASA चे व्हॉयजर-1 हे अंतराळयान पृथ्वीपासून तब्बल 26 अब्ज किलोमीटर