Ambernath Crime : अंबरनाथमध्ये खळबळजनक घटना, ८ लाखांचे अमली पदार्थ जप्त

अंबरनाथ : भगतसिंग नगर परिसरात अंबरनाथ पोलिसांनी तब्बल ८ लाखांचे हेरॉईन (अमली पदार्थ) जप्त केल्याची घटना समोर आली आहे. अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या आरोपींना यामुळे धक्का बसला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने भगतसिंग नगरात छापा टाकत ही धडाकेबाज कारवाई केली.


शुक्रवारी सायंकाळी भगतसिंग नगर परिसरात शरीफ शेख नावाची व्यक्ती अमली पदार्थ विक्री करत असल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. शरीफ राहायला भगतसिंग नगर परिसरातच होता. खूप दिवसांपासून तो पोलिसांच्या टार्गेटवर होता. पण ठोस पुरावा नसल्याने त्याला अटक करत येत नव्हती. मात्र शुक्रवारी संध्याकाळी रंगेहात त्याला अटक करण्यात आली. नाव 'शरीफ'असले तरी त्याच्यावरचे आरोप मात्र समाजातील अनेक कुटुंबांच्या आयुष्याशी खेळणारे आहेत. शरीफ वर आधी पासून १७ गुन्ह्यांची नोंद आहे.तसेच त्याच्याकडून 8 लाख 54 हजार रुपयांचे हेरॉईन,150 सोलेशन बॉटल आणि इतर साहित्य जप्त केले.



भगतसिंग नगर परिसरात याआधी सुद्धा अमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पण अद्याप या भागातील अमली पदार्थांच्या विक्रीत अपेक्षेप्रमाणे घट होताना दिसलेली नाही. आता या प्रकरणातील आरोपी आणि त्याच्या नेटवर्कविरोधात मकोका (Maharashtra Control of Organised Crime Act or MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची तयारी पोलीस करत आहेत.अंबरनाथ पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी अशा मोहिमा आणखी तीव्र करण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''