FIFA World Cup 2026 Firing : फिफा विश्वचषक २०२६ च्या पूर्वी अमेरिकेतील इंग्लंडच्या बेस कॅम्पजवळ गोळीबार; ९ जण जखमी

वॉशिंग्टन : फिफा विश्वचषक २०२६ च्या (FIFA World Cup 2026 Firing) सुरुवातीला अवघे काही दिवस शिल्लक असताना अमेरिकेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने फुटबॉलविश्वात चिंता निर्माण केली आहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा अधिकृत बेस कॅम्प असलेल्या कॅन्सस सिटी परिसरात शनिवारी पहाटे झालेल्या अंदाधुंद गोळीबारात तब्बल ९ जण जखमी झाले. सुदैवाने या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नसला तरी विश्वचषकाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास कॅन्सस सिटीमध्ये अचानक गोळीबार सुरू झाला. ही घटना इंग्लंड संघाच्या नियोजित बेस कॅम्पपासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर घडली. तसेच संघासाठी राखीव असलेले हॉटेलही घटनास्थळाजवळ असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. (FIFA World Cup 2026 Firing)


गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. सुरुवातीला तीन महिलांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरच्या तपासात आणि गोळीबारानंतर झालेल्या गोंधळामुळे व चेंगराचेंगरीमुळे जखमींची संख्या ९ वर पोहोचल्याचे स्पष्ट झाले. सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. (FIFA World Cup 2026 Firing)



या घटनेमुळे इंग्लंडच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली असली तरी संघ सध्या कॅन्सस सिटीत उपस्थित नाही. इंग्लंडचे खेळाडू फ्लोरिडातील पाम बीच येथे सराव शिबिरात सहभागी झाले असून १३ जून रोजी ते कॅन्सस सिटीत दाखल होणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना कोणताही थेट धोका निर्माण झाला नाही. (FIFA World Cup 2026 Firing)


दरम्यान, कॅन्सस सिटी पोलिसांनी संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवली असून संशयितांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. विश्वचषकाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे अमेरिका प्रशासन आणि स्पर्धा आयोजकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जगभरातील लाखो फुटबॉलप्रेमी आणि संघांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. (FIFA World Cup 2026 Firing)



दरम्यान, इंग्लंड संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असून त्यांनी नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात न्यूझीलंडवर १-० अशी मात केली आहे. आता त्यांचा पुढील सामना कोस्टा रिकाविरुद्ध होणार असून त्यानंतर संघ कॅन्सस सिटीकडे रवाना होणार आहे. मात्र, या गोळीबाराच्या घटनेमुळे विश्वचषकाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. (FIFA World Cup 2026 Firing)

Comments
Add Comment

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव