Crime News : पोलीस असल्याचे सांगत वृद्धाला गंडा; साडेतीन तोळ्यांचे दागिने घेऊन पसार

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर शहरात पुन्हा एकदा ‘बनावट पोलीस’ टोळी सक्रिय झाल्याचं समोर आलं असून, पोलीस असल्याची बतावणी करत दोन भामट्यांनी एका ८४ वर्षीय वृद्धाची साडेतीन तोळे सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता परिसरात घडली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, गणपतराव विष्णू पंदारे (वय ८४) हे नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. अष्टविनायक कॉलनी (Ashtavinayak Colony ) परिसरातील कमानीजवळ ते पायी चालत असताना अचानक त्यांच्या मागून दोन अनोळखी इसम आले. सुरुवातीला या दोघांनी स्वतःची ओळख पोलीस म्हणून करून दिली. परिसरात चोरीच्या घटना वाढल्याचे सांगत त्यांनी पंदारे यांच्याशी संवाद साधला. यानंतर त्या भामट्यांनी अतिशय विश्वासाने आणि अधिकाराच्या सुरात, “गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील अंगठ्या काढा, सुरक्षित ठेवतो,” असे सांगितले.


समोर उभे असलेले लोक पोलीस असल्याचा विश्वास बसल्याने वृद्ध पंदारे यांनी कोणताही संशय न घेता गळ्यातील सुमारे दीड तोळ्याची सोन्याची चैन आणि हातातील दोन तोळ्यांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या त्या दोघांच्या ताब्यात दिल्या. मात्र, पुढच्याच क्षणी या दोघांनी चलाखीने खेळी केली. त्यांनी हातात काही अंगठ्या परत देत दिशाभूल केली आणि काही समजण्याच्या आतच ते गणेश बुक एजन्सीसमोर उभ्या असलेल्या दुचाकीवर बसून भिस्तबाग चौकाच्या दिशेने पसार झाले.



फसवणूक झाल्याचे लक्षात आले अन...


काही वेळानंतर पंदारे यांनी नीट पाहणी केली असता, हातात दिलेल्या अंगठ्या बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचबरोबर गळ्यातील सोन्याची चैनही परत मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. धक्क्यात गेलेल्या पंदारे यांनी तत्काळ परिसरातील नागरिकांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी कॉलनीतील एका महिलेने त्यांच्या मुलाला संपर्क करून संपूर्ण घटनेची माहिती दिली.


दरम्यान, दुसऱ्या दिवशी या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अज्ञात दोघांविरोधात तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे.



भामट्यांपासून सावध रहा


विशेष म्हणजे, शहरात यापूर्वीही वृद्ध नागरिकांना लक्ष्य करून स्वतःला पोलीस सांगत दागिने काढून घेण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोणीही स्वतःला पोलीस म्हणत दागिने किंवा मौल्यवान वस्तू काढण्यास सांगितल्यास तात्काळ ओळखपत्र मागावे किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''