New Delhi Fire Case : दिल्लीच्या तुघलकाबादमध्ये इमारतीला आग लागली नाही लावली, ३ जणांना जिवंत जाळले ?

नवी दिल्ली : जुन्या दिल्लीतील तुघलकाबाद परिसरात १२ जूनच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास एका इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या आठ जणांना जवळच्या एम्स ट्रॉमा सेंटर आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पंकज पांडे, सुशीला देवी आणि सोनिया कुमारी या तीन जणांचा मृत्यू झाला. नियमानुसार आग प्रकरणी चौकशी सुरू झाली. ही चौकशी करत असताना पोलिसांना आग लागल्याचा नाही तर आग लावण्यात आल्याचा संशय येऊ लागला. एक सीसीटीव्ही फूटेज हाती आल्यानंतर पोलिसांचा संशय आणखी बळावला आहे.



पोलिसांनी तपासलेल्या फूटेजमध्ये एका कॅमेऱ्याचे फूटेज आग लावण्यात आल्याचा संशय गडद करण्यास कारणीभूत ठरले आहे. या फूटेजमध्ये इमारतीत वावरत असलेल्या एका मुलीच्या हालचाली अतिशय संशयास्पद अशा आहेत. या मुलीला कोणीतरी आग लावण्यास सांगितल्याचा संशय पोलिसांना आला. यानंतर संबंधित मुलीला शोधून पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. या चौकशीतून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.



सरिता नावाच्या इमारतीतच राहणाऱ्या महिलेच्या सांगण्यावरून मध्यरात्री आग लावल्याची कबुली मुलीने पोलिसांसमोर दिली आहे. सरिताने पेट्रोल आणि काडेपेटी दिली. पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या दीपकच्या स्कूटरला आग लावण्याची योजना होती. मात्र, आग केवळ स्कूटरपुरती मर्यादित राहिली नाही. तिने झपाट्याने संपूर्ण इमारतीला आपल्या भक्ष्यस्थानी पाडले. या आगीत तीन जणांचा बळी गेला आणि अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलून गेले.



दीपक आणि निरंजन यांच्यात बऱ्याच काळापासून आर्थिक वाद होता. धक्कादायक बाब म्हणजे, दीपक हा बाहेरचा नसून निरंजनचा चुलत भाऊ आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निरंजनला दीपकवर सूड घ्यायचा होता. म्हणूनच त्याने त्याच्या स्कूटरला लक्ष्य करण्याची योजना आखली. पण स्कूटर जाळण्याचा प्रयत्न सुरू असताना आग पसरली आणि संपूर्ण इमारत संकटात सापडली. या प्रकरणी पोलिसांनी सरिता, निरंजन आणि राजकुमार यांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गोविंदपुरी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Comments
Add Comment

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून 'मुंबई बँक' जिंकण्याची जबाबदारी उपमहापौरांकडे

- वर्ष अखेरीस निवडणूक; प्रवीण दरेकर आणि संजय घाडी हे मित्र येणार आमनेसामने मुंबई (सुहास शेलार) : ठाणे जिल्हा

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही