Metro : मेट्रो-४ मोगरपाडा कारडेपो मार्गासाठीचा मार्ग मोकळा

मुंबई : मुंबई मेट्रो-४ आणि ४ए वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली-गायमुख या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पासाठी ठाणे येथील मोगरपाडा कार डेपोला जोडणाऱ्या संपर्क मार्गाच्या बांधकामासाठी ०.३९ हेक्टर कांदळवन वनजमीन हस्तांतरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.शासन निर्णयानुसार, ठाणे तालुक्यातील मोगरपाडा गावातील गट क्रमांक ३० मधील ही जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो पीआययू विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे. या जमिनीचा वापर मोगरपाडा कार डेपोपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या अॅप्रोच रोड, स्पर लाईन आणि संबंधित बांधकाम सुविधांसाठी केला जाणार आहे.


मुंबई मेट्रो-४ आणि ४ए हा प्रकल्प पूर्व उपनगर, ठाणे आणि विस्तारित महानगर क्षेत्राला जोडणारा महत्त्वाचा दळणवळण दुवा ठरणार आहे. या मार्गामुळे लाखो प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होऊन इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रणालाही मदत होणार आहे.या मंजुरीपूर्वी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडून आवश्यक पर्यावरणीय आणि वनविषयक परवानग्या मिळविण्यात आल्या आहेत. प्रकल्पासाठी प्रथम तत्त्वतः मंजुरी आणि त्यानंतर अंतिम मंजुरी देताना विविध पर्यावरणीय अटी घालण्यात आल्या असून त्यांचे काटेकोर पालन करणे एमएमआरडीएसाठी बंधनकारक राहणार आहे. राज्य शासनाने वन विभागाला प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अटींचे उल्लंघन झाल्यास मंजुरी मागे घेण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Municipal Corporation : जाहिराती प्रदर्शित करून रस्ते, पदपथ अडवू नका!

पादचारी प्रथम अभियानाला सहकार्य करण्याचे महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन श्रीगणेशोत्सव व

BMC Ganeshotsav : यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ८५ कृत्रिम तलावांत वाढ, गणेश भक्तांनी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे; महापालिका प्रशासनाने केले आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बाप्पांच्या मूर्ती विसर्जन

Mirzapur The Movie : ‘मिर्झापूर: द मुव्ही’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! नवव्या दिवशी कमाईत ४२% वाढ, जगभरात २४६ कोटींचा टप्पा पार

मुंबई : ‘मिर्झापूर: द मुव्ही’ची बॉक्स ऑफिसवरील दमदार कामगिरी दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. ४ सप्टेंबरला

Ganeshotsav 2026 : बाप्पांचे आगमन आणि विसर्जन मार्गावरील दहा पुलांवर यंदाही घ्यावी लागणार काळजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांच्या आगमन आणि विसर्जन मार्गावर येणाऱ्या शहरातील दहा प्रमुख पुलांवर यंदाही

Ganeshotsav Mumbai : मुंबईकरांनो, लाडक्या बाप्पासाठी मागवा घरपोच मोदकाचा नैवेद्य; महानगरपालिकेच्यावतीने श्रीगणेशोत्सवासाठी ‘मोदक महोत्सव २०२६’

महिला बचत गटांच्या माध्यमातून १४ सप्टेंबर २०२६ पासून घरपोच मिळणार मोदक मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांचे

Sound Pollution : ध्वनी हा उत्सवाचा भाग असला तरीही. संयम हीच संस्कृती

आगमन, विसर्जन मार्गात वाहतूक नियमांचे पालन करा बृहन्मुंबई सार्वजनिक उत्सव समन्वय समितीने केले आवाहन मुंबई