Nashik : सातपूरमध्ये बोगस लाचलुचपत अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, स्कॉर्पिओसह दोघांना अटक

Nashik : सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योग भवन परिसरात स्वतःला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून वावरणाऱ्या दोघा तोतया अधिकाऱ्यांवर सातपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. आलिशान महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनावर “ॲन्टी करप्शन ” असा फलक लावून, सुटाबुटात शासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वावरणाऱ्या या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून स्कॉर्पिओ वाहनासह “अॅंटी करप्शन कमिटी” असे छापलेले बनावट ओळखपत्र आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे.



नेमकं काय घडलं ?


सातपूर पोलिसांना त्र्यंबक रोडवरील उद्योग भवन परिसरात एक महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन (क्र. एमएच १५ जेएस ४८८६) संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. या वाहनावर “अॅंटी करप्शन” असा फलक लावण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कारवाई केली.


वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये सचिन महादू ठोके (रा. अंतरिक्ष, वावरेनगर, कामटवाडे) आणि त्याचा साथीदार रवींद्र द्विवेदी हे दोघे आढळून आले. यातील ठोके याच्याकडे “अॅंटी करप्शन कमिटी” असे नमूद असलेले बनावट ओळखपत्र मिळाले. या ओळखपत्रावर त्याचे पद “नाशिक शहर अध्यक्ष” असे छापण्यात आले होते. आलिशान वाहनाचा वापर करून स्वतःला लोकसेवक असल्याचे भासवणे, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांची दिशाभूल करणे आणि फसवणुकीचा प्रयत्न करणे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.



या प्रकरणात दोघांची सखोल चौकशी सुरू आहे. सातपूर पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार शेषराव केदारे यांच्या फिर्यादीवरून सचिन ठोके व रवींद्र द्विवेदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री आंबेकर पुढील तपास करीत आहेत.


 
Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''