Nashik : भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

Nashik : नाशिक-पुणे महामार्गावर कामत हॉटेलसमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून त्यांच्या पतीवर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने पोलिसांनी अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


रविवारी (दि. १४) मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. सुनंदा गणेश ढाके (वय ५८, रा. श्रीनिवास कोर्ट, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड) यांचा या अपघातात मृत्यू झाला, तर त्यांचे पती गणेश मुरलीधर ढाके (वय ६३) गंभीर जखमी झाले आहेत.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ढाके हे पत्नी सुनंदा यांच्यासह मोटारसायकल (एमएच १५ एफएल ८०२८) वरून द्वारका परिसरातून नाशिकरोडकडे जात होते. त्यांची दुचाकी नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) कामत हॉटेलसमोर पोहोचली असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की, ढाके दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले आणि दुचाकीच्या मागील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.



अपघातानंतर संबंधित वाहनचालक मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, त्याच मार्गावरून जात असलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी भोसले आणि त्यांच्या मित्रांनी तत्परता दाखवत जखमींना मदत केली. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना सुनंदा ढाके यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ढाके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे, गणेश ढाके यांच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.



या प्रकरणी मृत महिलेची मुलगी छाया लोमेश भोगे (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे फरार वाहनचालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा नाशिक-पुणे महामार्गावरील भरधाव वाहनचालकांचा बेफिकीरपणा समोर आला असून, अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या चालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''