Nashik : फेस रिकग्निशनद्वारे होणार नाशिकमध्ये मतदान, विधान परिषद निवडणुकीत राज्यातील पहिला प्रयोग

नाशिक : निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी नाशिकमध्ये एक महत्त्वाचा तांत्रिक प्रयोग राबविण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांच्या ओळख पडताळणीसाठी फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.


विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अवघे ६१९ मतदार अआहे. त्यामुळे नाशिकमध्ये यासंदर्भातील राज्यातील पहिला प्रयोग राबवण्यात येणार आहे. त्याला राज्य निवडणूक आयोगाने तत्त्वत: मान्यता दिली असून, १८ जून रोजी होणाऱ्या मतदानात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.



उपक्रमासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेतला आहे. सी डॅक या मान्यताप्राप्त संस्थेने खास ॲप तयार केले असून नाशिक महापालिकेसह अन्य नगरपालिकांमधील मतदारांचे फोटो आणि माहिती ॲपवर संकलित केली जात आहे. १८ जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान करताना आधी मतदार नगरसेवकाला चेहरा स्कॅन करून तपासले जाईल. त्यामुळे दुबार मतदानाचा प्रकार टळेल.


राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांनी या अभिनव प्रयोगाला मान्यता दिली आहे. मात्र हा प्रायोगिक स्वरूपातील उपक्रम असल्याने फेस रिकग्निशन प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित मतदाराला मतदानापासून वंचित ठेवले जाणार नाही. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून त्याला मतदानाची परवानगी दिली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



नाशिकमध्ये या पहिल्याच प्रयोगाला राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांनी मान्यता दिली आहे. अर्थात हा प्रयोग असल्याने मतदाराचे फेस रिकग्निशन होण्यात अडचणी आल्या तरी मतदान करू दिले जाणार आहे. त्यामुळे मतदार नगरसेवक किंवा उमेदवारांनी शंका घेण्याचे कारण नाही.


-मधुमालती सरदेसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''